हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Atal Pension Yojana – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) 1 फेब्रुवारी 2025 रोजी आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाकडे अनेक लोकांचे लक्ष लागले असून, यामध्ये अटल पेन्शन योजनेला (Atal Pension Yojana) मोठा निर्णय मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या योजनेतून लाभार्थ्यांना मिळणारी पेन्शन रक्कम वाढवण्याची योजना सरकार आखत आहे. तर चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
पेन्शन रक्कम 10,000 रुपये होण्याची शक्यता –
सध्या अटल पेन्शन योजनेतून (Atal Pension Yojana) 1000 ते 5000 रुपयांची पेन्शन दिली जाते, जी योगदानावर आधारित असते. पण येत्या अर्थसंकल्पात (Budget) योजनेसाठी एक महत्त्वाची घोषणा होऊ शकते, ज्याद्वारे किमान पेन्शन रक्कम 10,000 रुपये होण्याची शक्यता आहे. या योजनेचा उद्देश गरिबांना आणि असंघटित क्षेत्रातील कामकाजी व्यक्तींना निवृत्तीवयात आर्थिक मदत प्रदान करणे असून , निर्णय झालास लोकांना मोठा फायदा होणार आहे.
अटल पेन्शन योजनेची वैशिष्ट्ये (Atal Pension Yojana) –
या योजनेत लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास, त्याचे पूर्ण पैसे त्याच्या वारसदारांना दिले जातात.
अर्जदाराचे वय 18 ते 40 वर्षे असणे आवश्यक आहे.
या योजनेसाठी अर्जदाराला बँक खातं असणे आवश्यक आहे, तसेच अर्ज बँकेच्या वेबसाईटवरून डाऊनलोड करून भरता येतो.
अर्जदार वयाची 60 वर्षे पूर्ण केल्यानंतर संबंधित बँकेला मासिक पेन्शन मिळवण्यासाठी अर्ज करावा लागेल.
जर अर्जदार वयाची 60 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी योजनेतून बाहेर पडला, तर त्याला त्याने जमा केलेली रक्कम आणि त्या रकमेवर मिळालेलं निव्वळ उत्पन्न परत मिळेल.
केंद्रीय सरकारच्या या महत्त्वपूर्ण योजनेसाठी (Atal Pension Yojana) आगामी अर्थसंकल्पात आणखी सुधारणा आणि सुविधांची घोषणा केली जाऊ शकते, ज्यामुळे अधिकाधिक लोक याचा लाभ घेऊ शकतील.
हे पण वाचा : महाराष्ट्रातील हवामान पुढील 5 दिवस कसे असेल? IMD चा अंदाज पहाच
बँकिंग ते आरोग्य; AI चे हे कोर्सेस करून कमवा लाखात पगार