Atal Pension Yojana ठरतेय वरदान!! मिळतोय जबरदस्त रिटर्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आपण सर्वच आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी आपापल्या परीने बचत करत असतो. आपली आजची हिच बचत आपल्याला आपल्या वृद्धकाळात मदत करेल एव्हढे मात्र निश्चित. समाजातील असंघटित क्षेत्रातील तसेच खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना,तरुणांना भविष्याची चिंता सतावू नये आणि त्यांचा वृधोपकाळ सुरक्षित जाण्यासाठी केंद्र सरकारने 1 जून 2015 रोजी अटल पेन्शन योजना सुरू केली. अटल पेन्शन योजनेतील ग्राहकांना आजवर तब्बल 9% रिटर्न मिळाला आहे. गेल्यावर्षी 98 लाख जनतेने ह्या योजनेचा लाभ घेतला होता . 2022-23 ह्या वर्षी तब्ब्ल १ कोटी १९ लाख लोकांनी केली योजनेत नाव नोंदणी.

ह्या योजनेत सामील होण्याचे वय किमान 18 आणि कमाल 40 वर्षे आहे. अटल पेन्शन योजनेत तुम्हाला वयाच्या 60 वर्षापर्यंत ठरवून दीलेल्या मासिक हफ्त्याची रक्कम तुमच्या बँकेत जमा करावी लागेल. यानंतर वयाच्या ६० वर्षांनंतर तुम्हाला तुम्ही भरलेल्या हफ्त्याच्या रक्कमेवर किमान 1000 रुपए आणि कमाल 5000 रुपयांपर्यंत मासिक पेन्शन दिले जाईल.अटल पेन्शन योजनेत पेन्शनची रक्कम तुम्ही कोणती योजना घेतली आहे यावर अवलंबून असेल. जर तुम्ही कमी रक्कमेची पेन्शन योजना घेतली तर तुम्हाला पेन्शनची रक्कम कमी मिळेल आणि जर तुम्ही मोठ्या रक्कमेची पेन्शन योजना घेतली तर तुम्हाला जास्त रक्कम मिळेल.

थोडक्यात काय ? तर तुमची पेन्शन हि तुम्ही सुरुवातीला बँकेत भरलेल्या योजनेवर अवलंबून राहील. Atal Pension Yojana (APY) मध्ये, जर पॉलिसीधारक 60 वर्षापूर्वी मरण पावला, तर त्याने जमा केलेले पैसे आणि पेन्शनचे इतर फायदे त्याच्या वारसाला म्हणजेच नॉमिनीला मिळतील मित्रांनो जर खरंच तुम्हालाही वयाच्या साठी नंतर आयुष्य निश्चित घालवायचे असेल तर तुम्ही आजच जवळच्या बँकेत जाऊन अटल पेन्शन योजनेचे सदस्यत्व घ्या.