Atal Pension Yojna | 210 रुपयांच्या गुंतवणुकीतून मिळवा 60 हजारांची पेन्शन; पहा काय आहे योजना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जे लोक सरकारी क्षेत्रात काम करतात त्यांना निवृत्तीनंतर दर महिन्याला पेन्शन रुपात काही रक्कम त्यांच्या खर्चासाठी मिळत असते. परंतु जर तुम्ही खाजगी क्षेत्रात काम करत असाल, तर तुम्हाला अशा कोणत्याही प्रकारचे पेन्शन मिळत नाही. त्यासाठी अनेक लोक हे आधीपासूनच त्यांच्या पेन्शनची (Atal Pension Yojna) सुविधा करत असतात. जर तुम्ही देखील पेन्शन गुंतवणुकीचा विचार करत असाल आणि त्यासाठी पर्याय शोधत असाल, तर आज आम्ही तुम्हाला अशाच एका पेन्शनबद्दल माहिती देणार आहोत. त्यामुळे तुम्हाला खूप चांगला परतावा मिळेल.

तुम्ही जर असंघटित क्षेत्रात काम करत असाल, तर सरकारच्या या पेन्शन योजनेमध्ये तुम्ही सहज गुंतवणूक करू शकता. सरकारच्या या पेन्शन योजनेचे नाव अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojna) असे आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला दर वर्षाला 60,000 रुपये मिळणार आहे. आता आपण या अटल पेन्शन योजनेचे विविध फायदे आहेत ते फायदे जाणून घेणार आहोत.

महिन्याला ५ हजारांचे पेन्शन

सरकारच्या या अटल पेन्शन योजनेमध्ये तुम्हाला दर महिन्याला केवळ 210 रुपये जमा करायचे आहेत. तुमच्या निवृत्तीनंतर म्हणजे 60 वर्षानंतर तुम्हाला दर महिन्याला जास्तीत जास्त 5 हजार रुपये पेन्शन म्हणून मिळू शकते. यासाठी तुम्हाला दररोज 7 रुपये वाचवावे लागेल. ही सरकारी योजना चांगल्या परताव्याची हमी देते. तुम्ही जर 5 हजार रुपयांच्या पेन्शनसाठी 18 व्या वर्षी रक्कम गुंतवली, तर तुम्हाला दर महिन्याला 210 रुपये जमा करावे लागतील. जर 3 महिन्यांनी रक्कम भरल्यास तुम्हाला 626 रुपये द्यावे लागतील. आणि जर 6 महिन्यांनी तुम्ही ही रक्कम भरली तर तुम्हाला 1239 रुपये भरावे लागतील. जर तुम्ही दर महिन्याला 1000 रुपये पेन्शन मिळण्यासाठी वयाच्या 18 व्या वर्षी गुंतवणूक केली तर तुम्हाला दर महिन्याला 42 रुपये द्यावे लागतील.

काय आहे अटल पेन्शन योजना? | Atal Pension Yojna

निवृत्तीनंतर आपल्या म्हातारपणात उत्पन्नाची सुरक्षितता लक्षात घेऊन खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सरकारने 2015- 16 अर्थसंकल्पात ही नवीन अटल पेन्शन योजना आणलेली आहे. या योजनेद्वारे सरकार सामान्य लोकांना त्याचप्रमाणे खाजगी क्षेत्रात असलेल्या लोकांना शक्य तितकी बचत करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.

अटल पेन्शन कॅलक्युलेशन

या अटल पेन्शन योजना अंतर्गत ग्राहकांना दर महिन्याला निवृत्तीनंतर 1000 ते 5000 रुपये पेन्शन मिळते. भारत सरकार किमान पेन्शन योजनेची नागरिकांना हमी देते. केंद्र सरकार ग्राहकांच्या योगदानाच्या 50% किंवा वार्षिक 1000 रुपये पैकी जे कमी असेल ते योगदान देते. या योजनेअंतर्गत 1000, 2000, 3000, 4000 आणि 5000 रुपये पेन्शन उपलब्ध आहे. तुम्ही पेन्शनमध्ये किती गुंतवणूक करता, यामध्ये यावर तुम्हाला मिळणारे पेन्शन अवलंबून आहे. या योजनेचा लाभ घेतल्यावर तुम्हाला अनेक फायदे देखील मिळतात.