Ather 450 Apex Price Hike : Ather ची Electric Scooter 6000 रुपयांनी महागली; खरेदीदारांना धक्का

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात मागील १-२ वर्षांपासून इलेक्ट्रिक गाड्यांची क्रेझ चांगलीच वाढली आहे. पेट्रोलचा खर्च वाचवण्यासाठी इलेक्ट्रिक स्कुटर खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. देशात बजाज, Ather, TVS, OLA या कंपन्यांच्या स्कुटर मोठ्या प्रमाणात विकल्या जातायत.. त्यातही Ather च्या स्कुटरला ग्राहकांची चांगली पसंती पाहायला मिळतेय. मात्र आता Ather ची इलेक्ट्रिक स्कुटर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आर्थिक झळ बसणार आहे. कारण कंपनीने जानेवारी महिन्यात लाँच केलेल्या Ather 450 Apex ची किंमत वाढवली (Ather 450 Apex Price Hike) आहे. या स्कुटरच्या किमतीत 6 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

खरेदीदारांना धक्का – Ather 450 Apex Price Hike

Ather 450 Apex ही इलेक्ट्रिक स्कूटर जानेवारी 2024 मध्ये 1 लाख 89 हजार (एक्स-शोरूम) रुपयांच्या किंमतीसह लॉन्च करण्यात आली होती. मात्र आता या किमतीत 6 हजार रुपयांची वाढ करण्यात आल्याने ग्राहकांना ती 1 लाख 94 हजार 945 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) खर्च करून खरेदी करावी लागेल . त्यामुळे ग्राहकांचा खिशाला कात्री बसणार आहे. आधीच बाकी वस्तू महाग झाल्यात, त्यात आता इलेक्ट्रिक स्कुटरची किंमत वाढल्याने (Ather 450 Apex Price Hike) खरेदीदारांना धक्का बसला आहे.

काय फीचर्स मिळतात?

Ather 450 Apex 7kW इलेक्ट्रिक मोटर आणि 3.7kWh बॅटरी पर्यायासह लाँच करण्यात आली आहे. कंपनी या बॅटरीला 5 वर्षे/60,000 किलोमीटरपर्यंतची वॉरंटी देते. हि इलेक्ट्रिक स्कुटर फुल्ल चार्ज करण्यासाठी 5 तास 45 मिनिटांचा कालावधी लागतो, मात्र एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 157 किलोमीटरपर्यंतचे अंतर पार करण्याची क्षमता या इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये आहे. कंपनीचा दावा आहे कि अथरची हि स्कुटर 100 किमी/तास टॉप स्पीड वेगाने धावू शकते तसेच अवघ्या 2.9 सेकंदात 0 ते 40 पर्यंत वेग वाढवण्यास सक्षम आहे. या स्कूटरमध्ये ग्राहकांना स्मार्ट इको, राइड, इको, वार्प, स्पोर्ट आणि वार्प प्लस असे 6 रायडींग मोड मिळतात