हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एथर एनर्जीने आपल्या स्कूटरचा खप वाढवण्यासाठी आणि ग्राहकांना फायदा देण्यासाठी नवीन डिस्काउंट ऑफर जाहीर केली आहे. या अंतर्गत तुम्ही 16,259 रुपयांचा डिस्काउंट मिळवू शकता. एथरच्या 450 Plus आणि 450X स्कुटरवर हा लाभ मिळू शकतो. मात्र ही ऑफर कॉर्पोरेट कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी असेल.
नवीन कॉर्पोरेट आउटरीच प्रोग्राम अंतर्गत, एथर एनर्जीने 2,500 हून अधिक संस्थांसोबत भागीदारी केली आहे. या ऑफरमध्ये, तुम्हाला टॅक्स बचत, एक्सचेंज बोनस आणि इतर ऑफरसह 16,259 रुपयांची सूट मिळू शकते. या डिस्काउंट मध्ये कर्मचारी 4,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट, 4,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि कर्जावरील कर बचतीचा लाभ घेऊ शकतात.
28 फेब्रुवारी 2023 पर्यंत हा कॉर्पोरेट आउटरीच कार्यक्रम मान्य असेल. कंपनीची ही ऑफर कॉर्पोरेशन, भारती एअरटेल सारख्या इतर संस्थेच्या कर्मचाऱ्यांसाठी आहेत. कंपनीकडे सध्या 80 शहरांमध्ये 100 एक्सपीरियंस केंद्रे आहेत. कंपनी या वर्षी मार्चपर्यंत 100 शहरांमध्ये 150 केंद्रांपर्यंत विस्तार करेल. एथर एनर्जीकडे देशातील 900 स्टेशन्सचे फास्ट चार्जिंग नेटवर्क सुद्धा आहे, जे इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादकांमध्ये सर्वात मोठे नेटवर्क मानलं जाते.