प्रसिद्ध उद्योगपती एटलास रामचंद्रन यांचे निधन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – प्रसिद्ध भारतीय उद्योगपती आणि चित्रपट निर्माते एटलस रामचंद्रन (Atlas Ramachandran) यांचे दुबईत रविवारी निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. रामचंद्रन (Atlas Ramachandran) यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना शनिवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी त्यांना हार्ट अटॅक आल्याने त्यांचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला. ते गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते.

कोण आहेत एटलस रामचंद्रन?
रामचंद्रन (Atlas Ramachandran) हे सध्या बंद पडलेल्या टलस ज्वेलरीचे संस्थापक होते. ते बऱ्याच काळापासून दुबईमध्ये राहत होते. याच वर्षी त्यांनी ऑगस्टमध्ये, त्याने दुबईतील बुर निवासस्थानी आपला 80 वा वाढदिवस साजरा केला होता. रामचंद्रन (Atlas Ramachandran) यांना चित्रपटाची खूप आवड होती. त्यांनी अनेक मल्याळम चित्रपटांची निर्मिती केली तसेच त्यांनी 13 चित्रपटांमध्ये अभिनय आणि दिग्दर्शनसुद्धा केले आहे.

रामचंद्रन (Atlas Ramachandran) यांचा जन्म 1942 मध्ये केरळच्या त्रिशूर जिल्ह्यात झाला. एटलस दागिन्यांच्या व्यवसायासाठी जाहिरात करण्याच्या त्यांच्या अनोख्या शैलीमुळे त्यांना एटलस रामचंद्रन हे नाव मिळाले. कुवेत, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये त्याच्या सुमारे 50 शाखा होत्या. केरळमध्येही त्यांच्या शाखा होत्या. यादरम्यान रामचंद्रन (Atlas Ramachandran) यांना 2015 मध्ये आर्थिक फसवणुकीच्या आरोपाखाली दुबईत अटक करण्यात आली. त्यांना तीन वर्षांची कारावासाची शिक्षा झाली होती. त्यांच्या माघारी पत्नी इंदिरा आणि दोन मुले डॉ. मंजू आणि श्रीकांत असा परिवार आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!