व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

ATM मधून पैसे काढण्यासाठी बँकांचे काय नियम आहेत ते समजून घ्या !!!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ATM मधून किती वेळा पैसे काढता येतील, मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढले तर किती पैसे द्यावे लागतील याबाबत अनेकदा गोंधळ असतो. अनेक वेळा आपण मर्यादा संपल्यानंतरही पैसे काढतो आणि अशा वेळी बँक पैसे कापून घेते. यासंदर्भात RBI ची मार्गदर्शक तत्त्वे काय सांगतात हे जाणून घेउयात…

हे लक्षात घ्या कि, RBI कडून जून 2021 मध्ये एक मार्गदर्शक तत्व जारी करण्यात आले होते. ज्याअंतर्गत, 1 जानेवारी 2022 पासून, जर आपण बँकेने दिलेल्या मर्यादेनंतरही ATM मधून पैसे काढले तर प्रत्येक ट्रान्सझॅक्शनसाठी 21 रुपये द्यावे लागतील. सर्वसाधारणपणे बँकांकडून दर महिन्याला 5 फ्री ट्रान्सझॅक्शन दिले जातात. मात्र यानंतरही ट्रान्सझॅक्शन केल्यास पैसे कापले जातील.

बँका एटीएम सर्व्हिससाठी पैसे का घेतात ???

बँकांकडून ATM मशिन इन्स्टॉल करण्यासाठी आणि त्याची देखभाल करण्यासाठी पैसे खर्च केले जातात. त्यासाठी ग्राहकांच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवर दरवर्षी पैसे कापले जातात. मात्र, हे वेगवेगळे कार्ड आणि ऑफरनुसार बदलतात. एटीएमसाठी येणारा खर्च लक्षात घेऊन बँकांनी मर्यादेपेक्षा जास्त ट्रान्सझॅक्शनवर पैसे कापण्याची व्यवस्था केली.

काही टॉप बँकांच्या एटीएम ट्रान्झॅक्शन चार्जेसबाबतची माहिती जाणून घेउयात …

SBI customers alert! No online banking services available during this time | Mint

स्टेट बँक ऑफ इंडियाचे ATM ट्रान्झॅक्शनचे शुल्क आणि मर्यादा

SBI च्या ग्राहकांना ATM मधून नॉन-फायनान्शियल ट्रान्सझॅक्शन करण्यासाठी 5 फ्री ट्रान्सझॅक्शन मिळेल. यानंतर,एसबीआयच्या एटीएमवर प्रत्येक ट्रान्सझॅक्शनसाठी 5 रुपये आणि इतर बँकेच्या एटीएमवर प्रत्येक ट्रान्सझॅक्शनसाठी 8 रुपये द्यावे लागतील. यामध्ये जीएसटी वेगळा द्यावा लागेल.

त्याच वेळी, पैसे काढण्यासाठी प्रत्येक ट्रान्सझॅक्शन साठी SBI एटीएममध्ये 10 रुपये आणि इतर एटीएममध्ये 20 रुपये द्यावे लागतील. यामध्ये स्वतंत्रपणे जीएसटी आकारला जाईल. त्याच वेळी, SBI इंटरनॅशनल एटीएम 100 रुपये आकारेल आणि 3.5 टक्के जीएसटी लागू करेल.

ICICI Bank Axis Bank To Co Lead NUE With Amazon Visa As Partners - BW Businessworld

ICICI बँकेच्या एटीएम ट्रान्झॅक्शनचे शुल्क

ICICI बँकेकडून एकाच बँकेसाठी 5 ट्रान्सझॅक्शन आणि इतर बँकांसाठी 3 फ्री ट्रान्सझॅक्शन दिले जातील. त्यानंतर एटीएममधून पैसे काढल्यास 21 रुपये द्यावे लागतील. तसेच 5 ट्रान्सझॅक्शननंतर, जर फायनान्शियल ट्रान्सझॅक्शन केले तर 20 रुपये द्यावे लागतील आणि नॉन-फायनान्शियल ट्रान्सझॅक्शन केल्यास 8.50 रुपये द्यावे लागतील.

Punjab National Bank Reduces MCLR In Big Relief To Customers

पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएम ट्रान्झॅक्शनचे   शुल्क

PNB कडून मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू आणि हैदराबाद या मेट्रो शहरांमध्ये फायनान्शियल आणि नॉन-फायनान्शियल ट्रान्सझॅक्शनसाठी दरमहा 3 फ्री ट्रान्सझॅक्शन दिले जातात. त्याच वेळी, इतर शहरांमध्ये 5 ट्रान्सझॅक्शन देते. तसेच फ्री ट्रान्सझॅक्शन लिमिटनंतर, प्रत्येक ट्रान्सझॅक्शनसाठी 20 रुपये आकारले जातील. तर नॉन-फायनान्शियल ट्रान्सझॅक्शनसाठी 9 रुपये आकारले जातील.

HDFC Bank opened the first all-women branch in north Kerala

एचडीएफसी बँकेच्या एटीएम ट्रान्झॅक्शनचे शुल्क

HDFC बँकेकडून दर महिन्याला 5 फ्री ट्रान्सझॅक्शन दिले जातात. तसेच इतर बँकांसाठी, मेट्रो शहरात 3 ट्रान्सझॅक्शन तर नॉन मेट्रो सिटीमध्ये 5 ट्रान्सझॅक्शन दिले जातील. तसेच यानंतर रोख रक्कम काढल्यास प्रत्येक ट्रान्सझॅक्शनसाठी 21 रुपये द्यावे लागतील. त्याच वेळी, नॉन-फायनान्शियल ट्रान्सझॅक्शनवर 8.50 रुपये द्यावे लागतील. या दोन्ही रकमेवर स्वतंत्रपणे जीएसटी भरावा लागेल.

Axis Bank warns of slowing collections in coming weeks amid Covid second wave | Mint

एक्सिस बँकेच्या ATM ट्रान्झॅक्शनचे शुल्क

एक्सिस बँकेचे नियम देखील एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेप्रमाणेच आहेत. ही बँक देखील या मर्यादेनंतर प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर 21 रुपये कापते.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.axisbank.com/retail/cards/debit-cards/rupay-platinum-debit-card/fees-charges

हे पण वाचा :

Post Office च्या ‘या’ योजनेत दररोज 95 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा 14 लाख रुपये !!!

Tamilnad Mercantile Bank च्या FD वरील व्याजदरात वाढ, नवीन दर तपासा

Gold Price Today : सोने- चांदीच्या किंमतीत मोठी घसरण; पहा आजचे दर

BSNL कडून 49 रुपयांच्या प्लॅनमध्ये व्हॉईस कॉलिंगसहीत मिळेल इंटरनेट डेटा !!!

Multibagger Stock : ‘या’ केमिकल कंपनीच्या शेअर्सने गुतंवणूकदारांना केले मालामाल !!!