पंतप्रधान मोदींना धमकी देणाऱ्या तरुणाला अटक; ATS च्या पथकाची कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी देण्यात आल्याची घटना नुकतीच घडली होती. या प्रकरणी सुरक्षा यंत्रांकडून धमकी देणाऱ्याचा शोध घेतला जात होता. या प्रकरणात एक तरुणी आणि गुजरातमधील एका तरुणाचे नाव समोर आले होते. त्यानंतर गुजरात एटीएसने मोदींना धमकावल्याच्या आरोपाखाली अमन सक्सेना या तरुणाला शनिवारी रात्री अटक केली आहे.

गुजरात एटीएसचे निरीक्षक व्हीएन बघेला हे पथकासह रात्री दहाच्या सुमारास सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात पोहोचले. यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीनेअमन सक्सेनाला आदर्शनगरमधून अटक करण्यात आली. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान कार्यालयाच्या आयडीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना ई-मेलद्वारे धमकी देण्यात आली होती. या प्रकरणात गुजरातमधील एक तरुण आणि तरुणीचे नाव पुढे आले होते. त्यानंतर एटीएसचे संयुक्त पथक तिन्ही आरोपींचा शोध घेत होते.

अटक करण्यात आलेला आरोपी अमन सक्सेना हा काही काळापूर्वी राजर्षी कॉलेज, बरेली या ठिकाणी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. परंतु, त्याने ते शिक्षण अपूर्ण सोडले. आरोपींनी कोणत्या उद्देशाने धमकी दिली, याचा तपास केला जात आहे.