साताऱ्यात वाहतूक पोलिसांमुळे अट्टल दुचाकी चोरटा सापडला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | गोडोली येथे दुचाकी चोरी करताना एकाला पकडल्यानंतर त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याच्याकडून आणखी 4 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. सातारा ट्रैफिक पोलिसांमुळे या गुन्ह्याची उकल झाल्यानंतर शहर डीबी पथकाने पुढील कामगिरी केली. सोमनाथ रामचंद्र चव्हाण (वय- 27, रा. राहुडे ता. पाटण) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सोमनाथ चव्हाण याला बुधवारी दुचाकी चोरताना दुचाकी मालक व ट्रॅफिक पोलिस प्रदीप मोहिते, अमर काशीद यांनी गोडोली येथे रंगेहाथ पकडले होते. संशयिताला ताब्यात घेवून ट्रॅफिक पोलिसांनी शहर पोलिसांकडे दिल्यानंतर गुन्हे प्रकटीकरण विभागाने (डीबी) संशयिताकडे अधिक चौकशी करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्याच्याकडे कौशल्याने तपास केला असता त्याने सातारा शहरात आणखी 4 दुचाकींची चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी दुचाकी चोरीची माहिती घेतली असता दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल झाले होते. पोलिसांनी चोरीच्या दुचाक्या करुन संशयिताला अटक केले.

पोनि भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सुधीर सुजीत भोसले, अविनाश चव्हाण, ज्योतीराम पवार, पंकज ढाणे, अभय साबळे, विक्रम माने, गणेश भोंग, सागर गायकवाड, गणेश घाडगे, संतोष कचरे, विशाल धुमाळ यांनी कारवाईत सहभाग घेतला.