श्रद्धा हत्या प्रकरण; आफताबच्या पोलीस व्हॅनवर तलवारीने हल्ल्याचा प्रयत्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पुनावाला याने नुकतीच आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला पॉलीग्राफ चाचणी केल्यानंतर त्याला लॅबमधून जेलमध्ये नेलं जात होतं. या दरम्यान पोलिसांच्या गाडीवर हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

श्रद्धा वालकर हत्याकांडाचे सत्य जाणून घेण्यासाठी पोलिसांनी आफताबच्या नार्को आणि पॉलिग्राफी टेस्टची न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. परवानगी मिळताच आफताबच्या नार्को टेस्टची प्रक्रिया सुरु करण्यात आली. नार्को टेस्ट दरम्यान पोलिसांना महत्वपूर्ण पुरावे मिळाले. मात्र, आजही आफताबची नार्को टेस्ट करण्यात आली. त्याची टेस्ट करल्यानंतर त्याला घेऊन जात असताना कार्यकर्त्यांनी गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांनी हवेत फायरिंग केल्याने हल्लेखोर दूर पळाले. नंतर आफताबला घेऊन पोलिसांची गाडी जेलकडे रवाना झाली.

पोलिसांनी आफताबची यापूर्वीच पॉलीग्राफ चाचणीची तीन सत्रे पार केली आहेत. पॉलीग्राफ चाचणीला लाय डिटेक्टर चाचणी असेही म्हणतात. पॉलीग्राफ चाचणीमध्ये, रक्तदाब, नाडी आणि श्वासोच्छवासाचा वेग यासारख्या शारीरिक क्रियाकलापांची नोंद केली जाते आणि ती व्यक्ती सत्य बोलत आहे की नाही हे शोधण्यासाठी या डेटाचा वापर केला जातो.