Attempted Train Accident : रेल्वे घातपाताचा प्रयत्न!! ट्रॅकवर ठेवला सिलेंडर, ट्रेन आली अन…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील काही महिन्यात अनेक ठिकाणी रेल्वे डब्बे घसरल्याची घटना घडत आहे, त्यामुळे कुठेतरी घातपात करण्याचा प्रयत्न (Attempted Train Accident) सुरु आहे का? अशी शंका मनात येत होती. तीन आठवड्यांपूर्वी, साबरमती एक्स्प्रेसचे डझनभर डबे रुळावर असलेल्या दगडामुळे घसरले होते, त्यानंतर राजस्थानमध्येही अशाच एका रेल्वे ट्रॅकवर लोखंडी तुकडे आणि सिमेंट ब्लॉक्स ठेवण्यात आले होते. आता तर चक्क गॅस सिलेंडर आणि पेट्रोलची बाटली अज्ञातांनी रुळावर ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे रेल्वे विभागात (Indian Railways) मोठी खळबळ उडाली आहे.

रेल्वे ट्रॅकही उडवण्याचा प्रयत्न- Attempted Train Accident

प्रयागराजहून भिवानीकडे जाणाऱ्या कालिंदी कुंज एक्स्प्रेसच्या ट्रॅकवर एलपीजी सिलिंडर ठेवण्यात आला होता. शिवराजपूर परिसरात हा सिलिंडर ठेवण्यात आला होता. रविवारी सकाळी अचानक हि ट्रेन सिलिंडरला धडकली. या धडकेमुळे सिलिंडर रुळावरून दूर उडून गेला. सिलेंडर सोबत काडीची पेटी आणि पेट्रोलची बाटली सुद्धा ट्रॅकवर ठेवण्यात आली होती. याचाच अर्थ रेल्वे ट्रॅकही उडवण्याचा सदर आरोपींचा प्रयत्न होता. याबाबत अतिरिक्त पोलिस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) हरीश चंद्र म्हणाले की लोको पायलटने एलपीजी सिलेंडर ट्रॅकवर ठेवल्याचे पाहिले आणि आपत्कालीन ब्रेक लावला त्यामुळे मोठा अनर्थ टळला. लोको पायलटने तात्काळ गार्ड आणि गेटमनला घटनेची माहिती दिली. यानंतर पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि सदर घटनेचा तपास सुरू केला.

यानंतर खराब झालेले सिलिंडर जप्त करण्यात आले असून, पोलीस जबाबदार असलेल्यांची ओळख पटवण्याचे काम करत आहेत. या प्रकरणी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. यापूर्वी सुद्धा मागील काही काळात अनेक ठिकाणी रेल्वेचे डब्बे रुळावरून घसरल्याच्या घटना घडललेया आहेत. त्यामागे सुद्धा अशाच प्रकारचे घाणेरडे कृत्य केल्याचा संशय (Attempted Train Accident) आणखी बळकावला आहे. हे एकूण सर्व प्रकरण म्हणजे देशविरोधी कृत्य म्हणता येईल.