हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर तुम्ही सध्या बजेटमध्ये नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर Xiaomi कडून आलेली ही संधी नक्कीच तुमच्यासाठी आहे. Xiaomi ने आपल्या Summer Savings Sale अंतर्गत Redmi Note 14 5G या नवीन स्मार्टफोनवर जबरदस्त सवलत जाहीर केली आहे. डिसेंबरमध्ये भारतात लाँच झालेल्या या फोनची सुरुवातीची किंमत 17,999 रु होती. मात्र सध्या Amazon वर हा फोन 12 हजारामध्ये उपलब्ध आहे. यासोबतच, निवडक बँकांच्या क्रेडिट कार्ड्सवर रु 1,000 पर्यंतची अतिरिक्त सवलतही दिली जात आहे.
Redmi Note 14 5G फीचर्स –
Redmi Note 14 5G मध्ये अनेक आकर्षक फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये 6.67 इंचांचा AMOLED डिस्प्ले असून, 120Hz रिफ्रेश रेट, HDR10+ सपोर्ट आणि 2100 निट्स ब्राइटनेससारखी वैशिष्ट्ये आहेत. हा फोन MediaTek Dimensity 7025 Ultra या प्रोसेसरवर चालतो आणि Android 14 वर आधारित आहे. यामध्ये 8GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंत स्टोरेज पर्याय उपलब्ध आहेत. कॅमेराच्या बाबतीत, यामध्ये 50MP + 8MP + 2MP असा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असून, सेल्फीसाठी 20MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. डिझाईनच्या बाबतीतही हा फोन स्टायलिश असून, ग्लास फिनिश आणि IP64 रेटिंगसह धूळ व पाण्यापासून संरक्षण देतो.
कमी किमतीती दमदार फोन –
जर तुमच्याकडे जुना स्मार्टफोन चांगल्या स्थितीत असेल, तर तुम्ही एक्सचेंज ऑफरचा लाभ घेऊन Redmi Note 14 5G आणखी स्वस्तात घेऊ शकता. Amazon वरील या ऑफरमध्ये तुम्हाला तुमच्या जुन्या फोनसाठी रु 16,500 पर्यंतची एक्सचेंज व्हॅल्यू मिळू शकते. अगदी रु 5,000 चाच एक्सचेंज व्हॅल्यू मिळाल्यासही, हा स्मार्टफोन तुम्हाला केवळ रु 11,998 मध्ये मिळू शकतो. त्यामुळे बजेटमध्ये नवीन आणि दमदार फीचर्स असलेला 5G स्मार्टफोन घ्यायचा असेल, तर ही एक उत्तम संधी आहे.
बँक कार्ड वापरून सवलत मिळवा –
ही ऑफर मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त Amazon ला भेट द्यावी लागेल. तिथे Redmi Note 14 5G निवडा, योग्य बँक कार्ड वापरून सवलत मिळवा आणि तुमचा जुना फोन एक्सचेंज करून अंतिम किंमत आणखी कमी करा. त्यामुळे जर तुम्ही एक परवडणारा, परंतु फीचर्सने भरलेला स्मार्टफोन शोधत असाल, तर Redmi Note 14 5G सध्या सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.




