अजित पवारांच्या विधानावर सहकारमंत्री सावे यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाले की,

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

मी सध्या अभ्यास करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज गो ब्राम्हण पती पालक होते. म्हणजेच गो ब्राम्हण पती पालकप्रमाणे ब्राम्हणांचे पालक मान्य आहे पण कुणबी, शिवा काशिद असेल दलीत समाजाचे पालक नव्हते का? मी ब्राम्हणांबद्दल बोलत नाही पण महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना अनेक ब्राह्मणांनी मदत केली आणि विरोधही केला. शिवाजी महाराजांसोबत वेगवेगळ्या जातीचे लोक होते पण अभ्यास करून सांगेन,अशी प्रतिक्रिया राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांनी विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्या विधानावर दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावरही निशाणा साधला.

नायगाव, ता. खंडाळा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या 192 व्या जयंतीनिमित्त नायगाव या गावी राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, पहिल्यांदा आमदार झाल्यावर देखील मी नायगाव येथे दर्शनाला आलो होतो. त्यानंतर आज आलो आहे. राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी जे विधान केले आहे त्यांच्या त्या विधानावर आत्ता बोलणार नाही. आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. त्यामुळे आता बोलणार नाही.

सत्ता गेल्यावरच यांना या सगळ्या गोष्टी का आठवू लागल्या आहेत? एवढी वर्षे सत्तेत असताना त्यांनी काय केलं? या सगळ्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपण काय आणि कुणाबद्दल बोलत आहोत. मला एकतरी मुस्लीम परिवार दाखवा ज्याने आपल्या मुलाचे नाव औरंगजेब ठेवलं आहे?असे म्हणत मंत्री सावे यांनी जितेंद्र आव्हाड यांना प्रश्न विचारला.

यावेळी नायगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या 192 व्या जयंतीनिमित्त नायगाव या गावी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासह विविध मान्यवरांनी उपस्थिती लावून अभिवादन केले.