नगरसेविकेला प्लास्टिक वापरल्यामुळे ५०० रुपयांचा दंड, आयुक्तांना गिफ्ट देणे पडले महागात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी । नवनियुक्त मनपा आयुक्तांना भेटायला गेलेल्या भाजप शिष्टमंडळातिल एका नगरसेविकेने मनपा आयुक्तांना प्लास्टिक रॅपरमध्ये पेन दिला होता. हा पेन प्लस्टिकच्या रॅपरमध्ये पॅक केला आहे. हे आयुक्तांच्या लक्षात आल्यानंतर आयुक्तांनी या नगरसेविकेला ५०० रुपयांचा दंड केला आहे. मनीषा मुंढे असं या नागरसेविकेचं नाव आहे.

मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांनी कालच पदभार स्वीकारला आहे. मनपा अधिकाऱ्यांनी त्यांना प्लस्टिक कव्हरमध्ये बुके देऊन स्वागत केल्याने त्यांनी मनपाचे सहाय्यक संचालक नगररचना विभागाचे अधिकारी आर.एस महाजन यांना देखील पाच हजाराचा दंड केला होता. तसेच आज पुन्हा मुंडे या नगरसेविकेला दंड केला आहे. पांडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून सलग दुसऱ्या दिवशी दंड देण्याची ही दुसरी घटना आहे.

Leave a Comment