जिल्हा व्यापारी महासंघातर्फे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

0
44
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद |  व्यापरी महासंघातर्फे विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. कोरोना मुळे अनेक व्यापारी अडचणीत सापडले आहेत. लॉकडाऊनमुळे संपूर्ण बाजारपेठ बंद आहे. या पार्शवभूमीवर व्यापाऱ्यांनी निवेदनात मागण्या केल्या आहेत.

निवेदनामध्ये शासकीय व निमशासकीय कर भरण्याची व विवरणपत्र दाखल करण्याची मुदतवाढ मिळवून देणे, जीएसटी विभागाकडून मुदतवाढ मिळणे, आयकर विभागाचे मागील विवरणपत्र भरण्याची मुदतवाढ मिळणे, महानगरपालिका मालमत्ता कर भरण्याची मुदतवाढ मिळणे थकित करा वरील व्याज व दंड माफ करून मिळणे, एमेसिबी च्या लाईट बिल वरील व्याज व दंड न आ कारता बिल भरणा करण्याची मुदतवाढ मिळणे, 31मार्च नंतर बँकेच्या थकीत कर्जावरील व्याज भरण्याची मुदत वाढ मिळवून देणे तसेच गेल्या वर्षभरात मध्ये शासनातर्फे बाजारपेठ बंद केल्यामुळे लहान-मोठे व्यापाऱ्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले आहे तरी शासनाकडून आर्थिक मदत मिळवण्याकरिता सहाय्य करणे, त्याचप्रमाणे लवकरच पावसाळा सुरू होणार असून मान्सून पूर्व रिपेरिंग चे कामे करण्याकरिता चार दिवस संपूर्ण बाजारपेठ उघडण्यास परवानगी देणे व सध्या अत्यावश्यक सेवेची दुकाने सात ते अकरा पर्यंत चालू आहे त्याऐवजी दुपारी एक वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी देणे.

या सर्व मागण्यासाठी औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथराव काळे, सचिव लक्ष्मीनारायण राठी, तांसुख भाऊ झांबड, राकेश सोनी शिवाजी पातळे यांनी निवेदन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here