जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्तांची थेट रस्त्यावर उतरत कारवाई ; २६ दुकानांकडून सव्वालाखाचा दंड वसूल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

औरंगाबाद | कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये चालू असलेल्या दुकानांवर शुक्रवारी जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांसह पथकाने काही दुकाने सील करण्याची कारवाई करत 26 दुकानांना दंड आकारला.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी दुकाने व आस्थापना नियमांचे पालन करीत नसल्याचे निदर्शनास आल्याने शुक्रवारी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि पोलीस आयुक्त डॉक्टर निखील गुप्ता यांनी सकाळपासूनच शहराच्या विविध भागात संयुक्त मोहीम राबवली. जालना रोड, शहागंज, किराडपुरा या शहरी भागात दोन्ही अधिकारी रस्त्यावर उतरले.

तसेच वाळुज महानगरातील बजाज नगर भागातील ही दुकाने सील करण्याची कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांच्या मदतीला महानगरपालिकेचे पथक होते.
कारवाई यादी सकाळी नऊ वाजता कामगार उपायुक्त महापालिका व महसूल अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत विशेष भरारी पथके तयार करुन कारवाईचे आदेश दिले. या बैठकीनंतर दोन्ही अधिकाऱ्यांनी शहरातील शहागंज, किराडपुरा, जालना रोड बजाज नगर अशा अनेक ठिकाणी पाहणी करून कारवाई केली.  26 पैकी 16 दुकान कडून सव्वा लाख रुपयांचा दंड शुक्रवारच्या कारवाईत वसूल करण्यात आला.