शेतकरी पठ्ठयाचा अनोखा प्रयोग; कलिंगड लागवडीतून 3 महिन्यात 1 एकरात लाखोंचं उत्पन्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य शासनाकडून अनुदान मिळत असल्याने शेतकरी शेती क्षेत्राकडे वळू लागले आहेत. यामध्ये आता तरूणांकडूनही शेतीत अनुदानाच्या माध्यमातून अनेक प्रयोग करत कमी कालावधीत उत्पन्न घेतले जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोड येथील तरुण शेतकरी अक्षय लेंभे याने अवघ्या तीनच महिन्यांमध्ये 1 एकरात कलिंगड लागवडीतून लाखो रुपयांचं उत्पन्न मिळवलं आहे.

आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर अक्षयने नोकरी करण्यापेक्षा शेती करण्यास अधिक पसंती दिली. त्याने पारंपारिक पिकाला फाटा देत कलिंगडची शेती करण्याचा निर्णय घेतला आणि तीन वर्षांपूर्वी कलिंगडाची शेती सुरु केली. आज तो कलिगड विक्रीतून लाखो रुपये कमवत आहे. सुरुवातीला 1 एकरानंतर आता 2 एकरात त्याने कलिंगड लागवड केली आहे.

आजकाल अनेक तरुण शेती क्षेत्राकडे वळून नवनवीन प्रयोग करत आहेत. सध्या शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीमध्ये वातावरणामुळे वारंवार नुकसान सहन करावे लागत आहे. शेतकरी मित्रानो, तुम्हालाही कोणत्या फळाची किंवा रोपांची लागवड करायची असेल आणि रोपे खरेदी करायची असतील तर चिंता करू नका.

हॅलो कृषी हे मोबाईल अँप डाउनलोड करा आणि तुमच्या आसपास असलेल्या रोपवाटिका मालकांशी थेट आणि अगदी कमी वेळेत संपर्क साधा. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi डाउनलोड आणि Install करा. Hello Krushi ओपन करताच तुम्हाला त्यामध्ये रोपवाटिका, खत दुकाने आणि कृषी केंद्र हा पर्याय दिसेल. यावर क्लीक करताच तुम्हाला तुमच्या आसपास असलेल्या खत दुकानदार आणि रोपवाटिकांची यादी आणि त्यांचे मोबाईल क्रमांक दिसतील. आणि महत्वाचे म्हणजे तुम्ही पिकवलेला शेतमाल तुम्हाला हव्या त्या किमतीत विकू सुद्धा शकता. यासोबत आपल्याला शेतीतील इतर व्यवसायासाठी शासनाकडून देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या योजनांची माहिती आदी गोष्टीही Hello Krushi अँपवर पाहता येतात.

हॅलो कृषी डाउनलोड करण्यासाठी Click here…

Watermelons

पहिल्या 2 वर्षात 8 लाखांचं उत्पन्न

अक्षय लेंभे हे गेल्या तीन वर्षांपासून कलिंगड शेती करत आहेत. आतापर्यंत कलिंगड पीक त्यांनी 2 वेळा घेतले आहे. पहिल्यावेळी त्यांना 6 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. दुसऱ्यावेळी त्यांना 2 लाखांचं उत्पन्न मिळालं आहे. अक्षय लेंभे यांनी आतापर्यंत कलिंगड शेतीतून 8 लाखांचं उत्पन्न मिळवलं आहे. आणि यंदाही त्यांनी कलिंगडाची लागवड केली आहे.

watermelon mulching

3 महिन्यात 5 लाख रुपये नफा

कलिंगड हे तीन महिन्याचे पीक आहे. या पिकाला एकरी 50 ते 60 हजार रुपये खर्च येतो. 3 महिन्यात फळ बाजारात विकण्यासाठी तयार होते. एकरी या पिकातून 3 महिन्यात अडीच ते पाच लाख रुपये निव्वळ नफा मिळतो. शेतकरी हे पीक वर्षातून 4 वेळा घेऊ शकतात.

watermelon 02

कृषी विभागाचे मार्गदर्शन

आज कलिंगड लागवडीसाठी कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार अनेक शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. यात मल्चिंग पेपरवर प्लास्टिक ट्रे मध्ये स्वतः रोपे तयार करून त्यांची पूर्ण लागवड केली जात आहे. यामुळे खर्च आणि वेळ वाचण्यास मदत होते. वेलीची वाढ होण्यासाठी रासायनिक खते आणि फळधारणा होण्यासाठी सेंद्रीय खते दिली जात असल्याने लालबुंद आणि गोड चवीच्या कलिंगडाचे उत्पादन होऊ लागले आहे.

Watermelon 03

स्वतः बरोबर इतरांनाही कलिंगड लावडीसाठी प्रोत्साहित

अक्षय लेंभे याने प्रथम स्वताच्या शेतीत कलिंगड लागवड करत उत्पन्न मिळवले. त्यानांतर त्याने इतर शेतकऱ्यानाही पिकाबाबत व उत्पन्नबाबत माहिती देत कलिंगड शेती करण्यास प्रोत्साहित केले. अक्षयबरोबर मुरमा येथे एकनाथ लेंभे यांनी एक एकर ,रामनाथ लेंभे यांनी दोन एकर,पवन लेंभे यांनी एक एकर, अशोक लेंभे यांनी एक एकर आणि कचरु लेंभे एक एकरावर कलिंगडची लागवड केली आहे.