औरंगाबाद महापालिकेला नवीन आयुक्त मिळाले, आता विकास होईल का?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी। राज्याच्या सत्तासंघर्षात महापालिकेचे काम जवळपास दीड महिना आयुक्तांविना सुरू होते. प्रभारी आयुक्त म्हणून जिल्हाधिकारी काम पाहत असले तरी त्यांनी महापालिकेत लक्षच घातले नाही. त्यामुळे विविध वॉर्डांतील विकासकामांबरोबरच पालिकेतील धोरणात्मक कामेही प्रलंबित होती. बीडचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय हे नवीन आयुक्त म्हणून औरंगाबाद महापालिकेला मिळाले आहेत. पुढील आठवड्यात पांडेय पदभार स्वीकारणार आहेत. या पार्श्वभूमीवरच नवीन आयुक्त मिळाल्यामुळे आगामी महापालिका निवडणूक समोर ठेवून महापौरांनी रखडलेली विकासकामे मार्गी लावण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यामुळे आता प्रलंबित कामे मार्गी लागण्याचे स्पष्ट झाले आहे.

एप्रिल २०२० मध्ये महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणार असल्याने महापालिका सत्ताधाऱ्यांना प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्याची लगीनघाई सुरू झाली आहे. यासंदर्भात महापौर नंदकुमार घोडेले यांनी सातारा-देवळाई भागासाठी स्वतंत्र ड्रेनेजलाइन, मिटमिटा येथे प्रस्तावित सफारी पार्क व शासन दरबारी प्रलंबित असलेला रस्त्यांचा प्रस्ताव अशा ५७८ कोटींच्या तिन्ही निविदा लवकरच काढणार असल्याचे स्पष्ट केले.

सातारा आणि देवळाई या पालिकेत समावेश झालेल्या २ वॉर्डांसाठी पालिकेने स्वतंत्र १८३ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. त्यास मान्यता मिळाली आहे. अमृत योजनेतून या कामासाठी ८० टक्के निधी मिळणार आहे, तर उर्वरित निधी पालिकेला स्वतःच्या तिजोरीतून टाकावा लागणार आहे.

Leave a Comment