औरंगेजब हलकटच, स्टेट्स ठेवणाऱ्याना हाकला… उदयनराजे कडाडले

udayanraje on aurangzeb
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । औरंगजेबाचं उदात्तीकरण कोणी करत असेल किंवा त्याचे स्टेट्स ठेवत असेल तर त्याला देशातून हाकलून लावा… कारण औरंगजेबाचे उदात्तीकरण करण्यासाठी तो काय एवढा मोठा लागून गेलेला नाही, उलट तो हलकटच होता… परंतु काही लोकांना असं वाटत कि औरंगजेबाच्या कबरीमुळे शिवाजी महाराजांचे शौर्य दिसून येत, मात्र मला असं काही वाटतं नाही असं विधान भाजप खासदार आणि छत्रपती शिवरायांचे १३ वे वंशज उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी केलं आहे… सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मुघल शासक औरंगजेब आणि त्याच्या कबरीवरून वादंग उठलाय. या पार्श्वभूमीवर उदयनराजे यांनी आपली भूमिका मांडली.

पुणे जिल्ह्यातील वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज यांची 336वी पुण्यतिथी साजरी केली जाते आहे. त्यासाठी उदयनराजे वढू बुद्रुक येथे आले होते. उदयनराजेंनी छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन केलं. यावेळी बोलताना सातत्याने होणाऱ्या महापुरुषांच्या अपमानकार वक्तव्यावर त्यांनी आपलं मत परखडपणे मांडलं आणि सरकारला सुद्धा घरचा आहेर दिला. . औरंगजेबाचं उदात्तीकरण कोणी करत असेल किंवा त्याचे स्टेट्स ठेवत असेल तर त्याला देशातून हाकलून लावा… कारण औरंगजेबाचे उदात्तीकरण करण्यासाठी तो काय एवढा मोठा लागून गेलेला नाही, उलट तो हलकटच होता…असं म्हणत उदयनराजे कडाडले.

राज्यात सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह बोललं जातंय. या संदर्भात शासनाने कठोर कायदा करत मकोको प्रमाणे कायदा आणावा. त्यात अजामीन पात्र शिक्षा आणि किमान दहा वर्षाची शिक्षा व्हायला पाहिजे. आता पर्यंत अनेक अधिवेशन झाले, अलिकडे अधिवेशन पार पडलं. यात का कायदा करण्यात आला नाही? मुख्यमंत्री आणि सरकार बोळ्याने दूध पितात का? असं म्हणत सरकारला सुद्धा घरचा आहेर दिला. सध्या सुरू असणाऱ्याल वाघ्या कुत्र्याच्या मुद्द्यावरून सुद्धा उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली… तुम्ही सारख वाघ्या वाघ्या करताय,,, पण वाघ्या कोण? वाघ्या एकच, वाघ होऊन गेला तो म्हणजे शिवाजी महाराज असं उदयनराजेंनी म्हंटल.