Diwali 2023: लक्ष्मी पूजेचा शुभ मुहूर्त 12 की 13 नोव्हेंबर रोजी? जाणून घ्या सविस्तर माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिवाळी हा वर्षातील सर्वात मोठा सण आहे. दिवाळी सणाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व देण्यात आले आहे. दिवाळी कार्तिक महिन्यातील अमावास्येला साजरी केली जाते. त्यानुसार यंदा दिवाळी 12 नोव्हेंबर रोजी आली आहे. परंतु अनेक ठिकाणी दिवाळी 13 नोव्हेंबर रोजी देखील साजरी करण्यात केली जाईल. त्यामुळे आज आपण जाणून घेऊयात की नेमकी दिवाळी साजरी करण्याचा शुभ मुहूर्त कोणता असेल. तसेच लक्ष्मी मातेची पूजा कोणत्या मुहूर्तावर करण्यात येईल.

दिवाळी सण तिथी

यंदा दिवाळी सण 12 नोव्हेंबर रोजी आला आहे. यादिवशी सर्वजण लक्ष्मी माता आणि श्री गणेशाची पूजा करतील. खरे तर, 12 नोव्हेंबर रोजी कार्तिक महिन्यातील अमावस्या देखील आली आहे. ही अमावस्या दुपारी 2:43 वाजता सुरू होईल आणि 13 नोव्हेंबर रोजी दुपारी 2:55 वाजता समाप्त होईल. यामुळे अनेकजण दिवाळी 13 नोव्हेंबर रोजी साजरी करते.

दिवाळी पूजेचा शुभमुहूर्त

यावर्षी दिवाळी 12 नोव्हेंबर रोजी आली असली तरी लक्ष्मी माता आणि श्री गणेशाची पूजा करण्याचा मुहूर्त संध्याकाळचा असेल. यंदा दिवाळीच्या संध्याकाळी 5.40 ते 7.36 पर्यंत लक्ष्मी-गणेशाच्या पूजेचा शुभ मुहूर्त असेल. या वेळेमध्येच आपल्याला लक्ष्मी मातेची आणि श्री गणेशाची पूजा करावी लागेल. मनोभावे पूजा केल्यास घरात सुख समृध्दी टिकून राहील.

तसे पाहायला गेलो तर दिवाळी हा सण पाच दिवस साजरा केला जातो. त्यानुसार, 10 नोव्हेंबर 2023 रोजी धनत्रयोदशी आली आहे. नरक चतुर्थी ही 11 नोव्हेंबर रोजी आली आहे. तसेच, 12 नोव्हेंबर रोजी दिवाळी सण साजरी करण्यात येईल. 14 नोव्हेंबर रोजी गोवर्धन पूजा असेल, तर 15 नोव्हेंबर रोजी भाऊबीज असेल. भाऊबीज संपल्यानंतर तिथून पुढे तुळशीची लग्न सुरू होतात..