Thursday, February 2, 2023

कोरोना संकटात ऑस्ट्रेलियन क्रिकेट कडून भारताला ५०,००० डॉलर्सची मदत

- Advertisement -

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज देशात तीन लाखांच्या आसपास नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद होत आहे. अशा परिस्थितीमध्ये बाहेरील देश भारताच्या मदतीसाठी धावून आले आहेत. आता ऑस्ट्रेलियन क्रिकेट कडून भारताला कोविड संकटाशी सामना करण्यासाठी मदतीची घोषणा करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट कडून भारताला कोविड संकटात लढण्यासाठी ५०,००० डॉलर्सची मदत करण्याची घोषणा केली आहे.

ऑस्ट्रेलियन क्रिकेट असोसिएशन आणि युनिसेफ ऑस्ट्रेलिया, यांच्या पार्टनरशिप मधून ही मदत देण्यात येणार आहे. भारताला कोरोनाच्याच्या दुसऱ्या तीव्र लाटेचा सामना करावा लागत आहे. यामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटने दुःख व्यक्त केले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोघांच्या दरम्यान घनिष्ठ मैत्रीपूर्ण संबंध राहिले आहेत.ऑस्ट्रेलियन युनिसेफ कडून भारतातील covid-19 परिस्थितीशी लढा देण्यासाठी ऑक्सिजन जनरेशन प्लांट, टेस्टिंग इक्विपमेंट्स , देशातील लसीकरण प्रक्रिया याकरिता मदत करण्यात येणार आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलिया 50,000 डॉलर्सची मदत करत आहे.

- Advertisement -

ऑस्ट्रेलियन क्रिकेट असोसिएशन सीईओ यांनी याबाबत बोलताना सांगितले की ,”भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात घनिष्ट बांध आहेत आणि आमच्यातले क्रिकेट संबंधीचे प्रेम हे या मैत्रीचे केंद्र आहे. आमचे अनेक भारतीय बंधू आणि भगिनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करीत आहेत. हे दुःखदायक आहे. आम्ही मनाने त्यांच्या सोबत आहोत. ऑस्ट्रेलियाचे नागरिक त्यांच्या सोबत आहेत ” अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.