मुख्यमंत्र्यांनी सातारकरांची मने जिंकली – शिवेंद्रराजे भोसले

सातारा प्रतिनिधी | छत्रपतींनी मागण्या करायच्या नाहीत आदेश द्यायचे असे वक्तव्य काल मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी साताऱ्यात महाजनादेश यात्रेच्या सभे दरम्यान केले होते हे वक्तव्य करून 24 तासाच्या आत मुख्यमंत्र्यांनी छत्रपतींनी केलेल्या मागण्या मान्य करून सातरकरांची मने जिंकली आहेत. सातारच्या हद्दवाढीचे घोंगडे गेली कित्येक वर्षे भिजत पडले होते त्या बाबत या आधी सुद्धा शिवेंद्रराजेंनी मुख्यमंत्र्यांना … Read more

४०० मेंढ्यांसह ४ मेढपाळांना वाचवण्यात पोलिसांना यश, १०० हून अधिक गावे अद्याप संपर्कहीन

गडचिरोली प्रतिनिधी | जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक भागांमध्ये अतिवृष्टी देखील झाली आहे. त्यामुळे जवळपास सर्वच नद्यांना पूर आलेला आहे. गोदावरी नदी ओसंडून वाहत असून तिच्या पात्रातील अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. पूराच्या पाण्यात अडकलेल्या चार मेंढपाळांसह पाचशे मेंढ्यांना सोडवण्यात पोलिसांना यश आलं आहे. तेलंगणा राज्याच्या सीमावर्ती भागात चार नागरिक … Read more

अबब!!! सोन्याचे दर टेकले आभाळाला

मुंबई प्रतिनिधी | सोन्याच्या दरात विक्रमी दरवाढ झाली आहे. ३८ हजारचा टप्पा सोन्याने ओलांडला आहे ३८४७० रुपयावर तो काल स्थिर झाला. आज पर्यंतचा सर्वात मोठा दर म्हणून ह्या कडे पहिले जातेय. दर वाढीला बरीच कारण आहेत. नुकताच झालेला अर्थ संकल्पात त्याच्यावरील दोन टक्के कर वाढवला आहे. ‘ऑल इंडिया सराफ असोसिएशन’ने दिलेल्या माहितीनुसार सोन्याच्या भावात पन्नास … Read more

घोड्यावरुन येऊन वंचित बहुजन आघाडीच्या या महिला उमेदवाराने दाखल केला उमेदवारी अर्ज

Untitled design

कोल्हापूर प्रतिनिधी | अनोख्या पद्धतीने सर्वांचे लक्ष वेधत, सजविलेल्या घोड्यावरून येऊन शक्तिप्रदर्शनाने वंचित बहुजन आघाडीच्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. अरुणा माळी यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. उन्हाचा तडाखा असूनही हातात पक्षाचे झेंडे घेऊन कार्यकर्ते मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी झाले होते. हलगीचा कडकडाट, कैताळ आणि घुमक्याच्या वाद्यात ही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मिरवणूक काढण्यात आली. … Read more

या कारणामुळे सुजय विखेंनी मागितली आमदार कर्डिलेंची माफी

अहमदनगर प्रतिनिधी | सुशिल थोरात नगर मध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. शिवसेनेचे राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्यावर त्यांचे जावई राष्ट्रवादीतून लोकसभेला उभे असल्याने काहींनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. यापार्श्वभुमीवर आज सुजय विखे यांनी कर्डीले यांच्या घरी जाऊन त्यांची जाहिर माफी मागितली. राहुरीचे शिवसेना आमदार शिवाजी कर्डिले यांचे … Read more

डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापना केलेले हे मासिक झाले ९९ वर्षांचें, पहा कोण आहे संपादक

Dr Babasaheb Ambedkar

प्रबुद्ध भारत स्थापना दिवस | सुनिल शेवरे साल १९२०. परिषद माणगाव. अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर. छत्रपती शाहू महाराज यांनी याच परिषदेत डॉ बाबासाहेबांचं भविष्य ओळ्खल होतं म्हणून त्यांनी अस्पृशांचा एकमेव पुढारी म्हणून त्यांच्या नावाची घोषणा केली आणि आपल्या डोक्यावरील फेटा बाबासाहेबांच्या डोक्यावर घातला. आपणच खऱ्या अर्थाने अस्पृश्यतेचे प्रश्न सोडवू शकतो असा विश्वास मनात बिंबवणाऱ्या लोकराजा … Read more

मध्यप्रदेशच्या ३ विजयी आमदारांचं सातारा कनेक्शन – निष्ठावंत कार्यकर्त्याचा सन्मान

Thumbnail

सातारा | योगेश जगताप राजकारण म्हटलं की पैसा, प्रतिष्ठा या गोष्टी प्रामुख्याने येतात. कार्यकर्ते अनेक वर्ष काम करतात, पाठपुरावा करतात, मोर्चे-आंदोलने यशस्वी करतात, प्रत्यक्ष तळागाळात जाऊन संवाद साधतात. काही वेळेला नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यालाच त्या मतदारसंघाची माहिती चांगल्या पद्धतीने झालेली असते. अनेक अडचणी व उपेक्षांचा सामना करत हे कार्यकर्ते धडपडतच असतात. अचानक एखादा दिवस असा येतो की त्या … Read more

दिवसाच्या लोडशेडींगचा प्रश्न व शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी निवेदन

Satara

सातारा | जिल्ह्यातील विजेच्या शेतीपंपाचे लोडशेडिंग तीन दिवस व तीन रात्री असते. कडाक्याच्या थंडीत लोडशेडिंगमुळे शेतकऱ्यांच्या समस्यांत वाढ झाली आहे. या व इतर विविध मागण्यांसाठी कोरेगाव विकास आघाडी व शेतकरी संघटनेतर्फे आज महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळाच्या सातारा शाखेत निवेदन देण्यात आले. काय आहेत मागण्या? १) कडाक्याच्या थंडीमुळे शेतकऱ्यांना प्रचंड शारीरिक त्रास होत आहे. २) … Read more

​मेट्रोच्या कामाला गती  मात्र पुणेकरांना वाहतुकीचा अडथळा

IMG WA

 पुणे | स्मार्ट सिटी अंतर्गत शहरांचा कायापालट करण्याचा निर्णय झाल्यानंतर पुणे मेट्रो कामाला आता गती मिळाली आहे. शहरात ठिकठिकाणी मेट्रोची कामे सुरु असल्याने पुणेकरांना मात्र वाहतुक समस्यांचा सामना करावा लागत आहे. याचाच प्रत्यय आज कर्वे पुतळ्यापासून वर्तुळाकार मार्ग सुरु केल्यामुळे आला. संध्याकाळी एसएनडीटी पासून वाहन वळविण्याचा निर्णय घेण्यात आला. पोलीस तैनात करून बेरिकेड्स लावण्यात आले … Read more

जागतिक शांततेसाठी बुद्धविचारांच्या प्रसाराची आवश्यकता – राज्यपाल सी. विद्यासागर राव

IMG WA

मुंबई | सतिश शिंदे शांतता, सौहार्द, ज्ञान आणि करुणा या तत्त्वज्ञानाचा आधार असलेला बौद्ध धर्म हा भारताच्या महान आध्यात्मिक परंपरांचा प्रसारक आहे. आजची जागतिक परिस्थिती पाहता जगाला बुद्धविचारांची आवश्यकता आहे, असे मत राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे व्यक्त केले. के. जे. सोमय्या सेंटर फॉर बुद्धीजम स्टडीजच्या 25 वर्षपूर्तीनिमित्त ‘एम्बडींग कंम्पॅशन : अवलोकितेस्वरा इन … Read more