Thursday, March 23, 2023

४०० मेंढ्यांसह ४ मेढपाळांना वाचवण्यात पोलिसांना यश, १०० हून अधिक गावे अद्याप संपर्कहीन

- Advertisement -

गडचिरोली प्रतिनिधी | जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक भागांमध्ये अतिवृष्टी देखील झाली आहे. त्यामुळे जवळपास सर्वच नद्यांना पूर आलेला आहे. गोदावरी नदी ओसंडून वाहत असून तिच्या पात्रातील अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. पूराच्या पाण्यात अडकलेल्या चार मेंढपाळांसह पाचशे मेंढ्यांना सोडवण्यात पोलिसांना यश आलं आहे.

तेलंगणा राज्याच्या सीमावर्ती भागात चार नागरिक आपल्या मेंढ्यांना चारण्यासाठी घेऊन गेले होते. परंतु नदीचे पाणी अचानक वाढल्याने त्यांना परत येणे शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांना पुरातच अडकून पडावे लागले. नदीच्या पुरात राञीपासुन चार नागरीक आणि पाचशे मेंढ्या अडकल्याची माहिती गावातील नागरिकांना मिळाल्यानंतर याची माहिती पोलिसांना कळवण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी पुराच्या प्रवाहात राञीपासुन अडकलेल्या चार नागरीकासह पाचशे मेंढ्यांची सुरक्षीत सुटका केली आहे.

- Advertisement -

तेलंगणा पोलीसानी सीमेवरील आपल्या असरअली पोलीसांना वायरलेसवरुन मदतीची मागणी केली होती. त्यानुसार असरअली पोलीस स्टेशन कडून वन विभागाची बोट घेऊन सोमणपल्ली ते पंकेना दरम्यान गोदावरी नदीत प्रवाहाच्या उलट्या दिशेने जाऊन अडकलेल्या नागरिकाना आणि 500 मेंढ्यांना सुरक्षित बाहेर काढले आहे. त्यामुळे सुटका झालेले नागरिक आणि त्यांच्या कुटुंबियांकडून पोलिसांचे आभार मानले जात आहेत. गडचिरोली जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी नागरिकांनी खबरदारी घेण्यासंदर्भात व्हिडिओद्वारे आवाहन केले आहे.