Auto Expo 2023 मध्ये TATA घेऊन येतेय ‘या’ 3 Electric Cars; पहा काय आहेत फीचर्स?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑटो एक्स्पो 2023 मध्ये आपल्याला (Auto Expo 2023) अनेक दमदार गाड्या पाहायला मिळणार आहेत. प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी टाटा मोटरने सुद्धा ऑटो एक्स्पो 2023 साठी कंबर कसली असून कंपनी या इव्हेंट मध्ये ३ इलेक्ट्रिक गाड्या घेऊन येणार आहे. यामध्ये टाटा पंच ईवी, टाटा कर्व ईवी आणि टाटा अविन्या ईवी या वाहनांचा समावेश आहे.

Tata Punch EV

Tata Punch EV-

ऑटो एक्स्पो 2023 मध्ये टाटा (Auto Expo 2023) आपली पंच EV सादर करणार आहे. Tata Punch EV कंपनीच्या ALFA प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. ही इलेक्ट्रिक गाडी 26kWh आणि 30.2kWh या दोन बॅटरी पॅक पर्यायांसह ऑफर केली जाण्याची शक्यता आहे. एकदा फुल्ल चार्ज केल्यांनतर ताटाची ही इलेक्ट्रिक गाडी सुमारे 250 ते 300 किलोमीटर रेंज देऊ शकते. Tata Punch EV ची किंमत 10 लाख रुपये असू शकते.

Tata Curvv EV

Tata Curvv EV- (Auto Expo 2023)

ata Curvv ही मध्यम (Auto Expo 2023) आकाराची कूप SUV असेल. टाटाचे हे इलेक्ट्रिक मॉडेल X1 प्लॅटफॉर्मवर आधारित आहे जे Nexon श्रेणीमध्ये वापरले जाते. या इलेक्ट्रिक गाडीमध्ये 40kWh बॅटरी पॅक मिळण्याची अपेक्षा असून एकदा फुल्ल चार्ज केल्यांनतर ही गाडी तब्बल ४०० किलोमीटरचे एव्हरेज देऊ शकते. Tata Curvv ही कार MG ZS EV, Hyundai Kona EV आणि Mahindra XUV400 यांसारख्या गाडयांना टक्कर देईल.

Tata Avinya EV

Tata Avinya EV –

ऑटो एक्स्पो 2023 मध्ये Tata Avinya EV सादर केली जाऊ शकते. हि गाडी कंपनीच्या Gen 3 Pure EV आर्किटेक्चरवर आधारित असेल. या कारच्या डिझाईनबद्दल सांगायचे झाल्यास, टाटा अवन्या ही MPV, हॅचबॅक आणि क्रॉसओव्हर यांचे मिळतंजुळतं रूप आहे. टाटा मोटर्सच्या म्हणण्यानुसार, एकदा फुल्ल चार्ज केल्यांनतर ही इलेक्ट्रिक कार जवळपास 500 किलोमीटर इतकी रेंज देण्यास सक्षम असेल.