लुल्लानगर चौकात रिक्षाने घेतला पेट

0
63
burning rikshaw
burning rikshaw
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोणतीही जिवितहानी नाही

पुणे | सुरज शेंडगे

रविवारी दुपारी १:३० च्या सुमारास लुल्लानगर चौकात अचानक रिक्षाने पेट घेतला. सीएनजी असलेल्या या रिक्षेच्या गॅस गळतीमुळे हा प्रकार घड़ला. सदर रिक्षा चालक लुल्लानगर चौकातुन बिबवेवाडीच्या दिशेने जात असताना हा प्रकार घडला , त्याचे नाव नासीर बागवान आहे. दरम्यान या घडनेच्या १० मिनिटांच्या आत अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. काही मिनीटांत त्यांनी आग आटोक्यात आणली. आग विझवताना काही वेळासाठी रस्ता बंद करण्यात आला होता म्हणून वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान आग पाहण्यासाठी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here