स्मार्टफोनसह iPhone वापरकर्त्यांसाठी धोक्याची घंटा ; ‘या’ अँप्सनी मोबाईल होतोय हॅक

0
1
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FBI ने स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी सावधगिरीचा इशारा दिला आहे . या चेतावणीमध्ये वापरकर्त्यांना शंका आणणाऱ्या अँपपासून सावध राहण्याचे सांगितले आहे, कारण असे अँप्स तुमची वैयक्तिक माहिती चोरी करू शकतात आणि मोठ्या आर्थिक फसवणुकीला कारणीभूत ठरू शकतात. FBI ने 18 जानेवारी रोजी एक अहवाल सादर केला आहे, ज्यामध्ये अनेक बँक खात्यांची हॅकिंगची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये बाजारातील अनके स्मार्टफोनसह iphone देखील हॅक झालेले आहेत. त्यामुळे कोणतेही अँप्स डाउनलोड करण्याआधी दक्षता बाळगा . तर चला या बातमीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

फॅन्टम हॅकर –

सुरुवातीला काही फसवणूक करणारे अँप्स अत्यंत विश्वासार्ह दिसतात आणि वापरकर्त्यांना आकर्षित करतात. मात्र, एकदा हे अँप डाउनलोड केले की, ते वापरकर्त्यांपासून महत्त्वाच्या परवानग्या मागतात. या परवानग्यांमुळे स्कॅमर्स तुमची खाजगी माहिती चोरी करू शकतात आणि तुम्हाला आर्थिक फसवणुकीच्या जाळ्यात अडकवू शकतात. FBI ने या प्रकाराला ‘फॅन्टम हॅकर’ असे नाव दिले आहे, जे लोकांच्या खात्यांमध्ये घुसखोरी करून त्यांना जाळ्यात अडकवतात.

तुमच्या खात्यावर हॅकिंग –

एकदा स्कॅमर्स वापरकर्त्यांची माहिती मिळवतात, ते बँकेचे प्रतिनिधी असल्याचे भासवून, तुमच्या खात्यावर हॅकिंगचा प्रयत्न झाला आहे, असे सांगतात आणि खातं सुरक्षित ठेवण्यासाठी पैसे दुसऱ्या खात्यावर ट्रान्सफर करण्याची मागणी करतात. अशा प्रकारे अनेक लोक घाबरून त्यांच्या खात्यातून पैसे ट्रान्फर करतात. तसेच, तांत्रिक मदतीच्या नावाखाली देखील फसवणूक केली जाते.

या गोष्टी टाळा –

WhatsApp किंवा SMS द्वारे आलेल्या लिंकवरून कोणतेही अँप्स डाउनलोड करू नका.
ईमेल किंवा APK फाइलद्वारे आलेल्या अँप्सपासून दूर रहा.
थर्ड पार्टी अँप स्टोअर्समधून अँप्स डाउनलोड करू नका.
सोशल मीडियाद्वारे आलेल्या लिंकवरून अँप्स डाउनलोड करू नका.

सुरक्षित राहण्यासाठी हे करा –

कोणतेही अँप डाउनलोड करण्यापूर्वी ते खरे आहे का हे पहा .
युजर्सच्या रेटिंग्स व प्रतिक्रिया वाचा.
बँकिंग किंवा आर्थिक अँप्स केवळ अधिकृत बँक वेबसाइटवरूनच डाउनलोड करा.