जंगल भ्रमंती द्वारे वन व वन्यजीव संवर्धन बाबत जनजागृती कार्यक्रम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प मार्फत वन्यजीव सप्ताह 2022 निमित्ताने आयोजित निसर्ग अनुभव कार्यक्रमच्या अनुषंगाने आज दि. 2 ऑक्टोबर रोजी मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी कराड येथील निसर्ग मित्र, व डॉक्टर यांचेसाठी निसर्ग शिक्षणा सहलीचे ढेबेवाडी वनपरिक्षेत्र वाल्मिक (पाणेरी) येथे आयोजन केले होते. मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी सर्वांना निसर्ग भ्रमंती द्वारे जंगलातील वन व वन्यजीव संपदा या बाबत भ्रमंती दर्म्यान सर्वांना सविस्तर माहिती दिली.

आलेल्या सर्वांना पाणेरी येथील जंगल पाऊल वाटेने फिरतीकरत वाल्मिक सड्या पर्यंत ट्रेकिंग करून सह्याद्री व्याघ्र प्रकल्प मधील जैविविधता, वन्यजीव अधिवास, कटीक, सड्या वरील व जंगलातील विविध वनस्पती, निसर्गचक्र, अन्न साखळी सड्यावर फुललेली विविध फुले, ऑर्किड , वनस्पती, याबाबत सर्वांना भाटे यांनी माहिती दिली . प्रत्येक संजीवांचे महत्त्व या बाबत प्रत्यक्ष पाहून समजून घेण्याची पर्वणी या निसर्ग सहलीतून उपलब्ध झाली.

वनक्षेत्रपाल ढेबेवाडी ज्ञानेश्वर राक्षे यांनी उपस्थित निसर्ग मित्र यांना वन्यजीव संवर्धन कसे महत्वाचे आहे व त्यासाठी व्याघ्र प्रकल्प करत असलेले कार्य या बाबत माहिती देऊन राज्य घटनेने आपल्या दिलेल्या अधिकार व कर्तव्य यांची जाणीव ठेऊन प्रत्येकाने वन व वन्यजीव संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असून त्या साठी सहकार्य करावे असे आवाहन केले. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पच्या वतीने सर्वांना अल्पोपहार व चहा पान ची सोय करण्यात आलेली होती.

सदर भ्रमंती मध्ये कराड परिसरातील डॉ हेमंत ताम्हणकर, डॉ श्रीकृष्ण ढगे, डॉ शरद क्षीरसागर, डॉ वर्षा देशपांडे, डॉ शर्वरी बेलापुरे, सारंग बेलापुरे , हेमंत केंजळे , डॉ रवींद्र अगरवाल , सी .ए मयूर माने, प्रा. रानभरे , वैभव संकपाळ व इतर जवळपास ५० नागरिक विद्यार्थी उपस्थित होते. सदर निसर्ग सहलीचे नियोजन मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी वन्यजीव साप्ताह निमित्ताने केले होते. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प चे उपसंचालक उत्तम सावंत , विभागीय वनअधिकारी विशाल माळी , सहाय्यक वनसंरक्षक तुषार ढमढेरे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले . ढेबेवाडी वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. ज्ञानेश्वर राक्षे व त्यांची टीम वनपाल ला.तु. मोहिते , वनरक्षक प्रियांका काळेल, सुमन जाधव, वनसेवक भरत पाटील यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळे ही भ्रमंती अतिशय यशस्वी झाली.

ह्या भ्रमंती दरम्यान भूल तज्ञ डॉ शर्वरी बेलापूर यांनी COLS (कॉम्प्रेशन ओन्ली लाईफ सपोर्ट) या विषयी मोलाचे मार्गदर्शन केले. हृदयविकाराचा झटका आल्यास रुग्णाच्या छातीवर वारंवार दाब देऊन प्राण वाचवण्याची पद्धत याला कॉल्स म्हणतात. हा हृदयविकाराचा झटका आल्यानंतर वैद्यकीय मदत मिळेपर्यंत रुग्णाला दिला जाणारा प्राथमिक उपचार कसा करावा व रुग्णाचे प्राण कसे वाचवावे ह्याबद्दल डॉ बेलापूर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.