Awsaneshwar Temple Stampede : श्रावणाच्या पहिल्याच सोमवारी शंकराच्या मंदिरात चेंगराचेंगरी!! 2 ठार 38 जखमी

Awsaneshwar Temple Stampede
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Awsaneshwar Temple Stampede । आज श्रावण महिण्याचा पहिलाच सोमवार आहे. त्यामुळे शंभू महादेवाच्या मंदिरात भक्तांची मोठी गर्दी बघायला मिळतेय.. महादेवाला अभिषेक घातला जातोय, तसेच त्याची पूजा केली जातेय. परंतु याच दरम्यान, उत्तरप्रदेशात एक भीषण दुर्घटना घडली आहे. उत्तर प्रदेश येथील अवसनेश्वर मंदिरात शंभू महादेवाला जलाभिषेक सुरू असताना, एक विजेचा तार तुटला आणि पडला, ज्यामुळे टिन शेडमधून करंट गेला. विजेच्या धक्क्यामुळे चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरी दरम्यान सुमारे ३८ भाविक जखमी झाले, तर २ जणांचा मृत्यू झाला.

नेमकं काय घडलं? Awsaneshwar Temple Stampede

ही घटना आज पहाटे ३ वाजता घडली. श्रावणी सोमवार असल्याने पहाटे ३ वाजताही भाविकांची मोठी गर्दी अवसनेश्वर मंदिरात पाहायला मिळाली. यावेळी एका माकडाने विजेच्या तारेवर उडी मारल्याने तार तुटली. यानंतर अशी बातमी पसरली कि वायर तुटली आणि लोकांना करंट बसलाय… हे ऐकताच भाविकांना धक्का बसला.. जीव वाचवण्यासाठी भाविक धावू लागले आणि चेंगराचेंगरी झाली. यामध्ये २ लोकांचा मृत्यू झाला तर ३८ जखमी झाले.

या घटनेनंतर (Awsaneshwar Temple Stampede) मोठ्या संख्येने पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सर्व जखमींना रुग्णवाहिकेने हैदरगड आणि त्रिवेदीगंज येथील आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले. एकूण १० जखमींना त्रिवेदीगंज सीएचसीमध्ये आणण्यात आले, त्यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना रेफर करण्यात आले आहे. त्याच वेळी, २६ जखमी भाविकांवर हैदरगढ सीएचसीमध्ये उपचार सुरू आहेत, त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचं बोललं जातंय. ही घटना कशी घडली याचा तपास अजूनही सुरू आहे.

बाराबंकी जिल्हा दंडाधिकारी शशांक त्रिपाठी म्हणाले की, माकडांच्या उपद्रवामुळे तार तुटून टिन शेडवर पडली, ज्यामुळे करंट पसरला आणि नंतर चेंगराचेंगरीसारखी (Awsaneshwar Temple Stampede) परिस्थिती निर्माण झाली. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. दर्शन सुरळीत सुरू आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेनंतर दुःख व्यक्त केलं आहे. तसेच मृतांच्या कुटुंबांबद्दल शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्याला गती देण्याचे निर्देश दिले आहेत. या दुर्घटनेनंतर आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आली आहे. आणि मंदिरात आलेले लोक नियमित पद्धतीने दर्शन आणि पूजा करत आहेत.