Ayodhya Ram Mandir : सचिन, रोहित, विराटसह ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूंना मिळालं राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Ayodhya Ram Mandir : आज संपूर्ण देशासाठी महत्वाचा आणि गौरवाचा दिवस असून आज अयोध्यातील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या भव्य दिव्य सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशातील ८००० हुन अधिक व्हीआयपी लोकांना निमंत्रण देण्यात आलं आहे. यामध्ये देशातील सर्वच क्षेत्रातील रथीमहारथींचा समावेश आहे. या सोहळ्याला देशातील दिग्गज क्रिकेटपटूना सुद्धा खास निमंत्रण (Cricketers Invitation To Ram Mandir) देण्यात आलं आहे. यामध्ये विराट कोहली, सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंघ धोनी तसेच रोहित शर्मासह अनेक खेळाडूंचा समावेश आहे.

विराट कोहलीला या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी बीसीसीआयने सुट्टी दिली होती, त्याचा ताफाही अयोध्येच्या दिशेने रवाना झाला आहे. तर माजी फिरकीपटू अनिल कुंबळे आणि जलदगती गोलंदाज व्यंकटेश प्रसाद सुद्धा राम मंदिराच्या उद्घाटनासाठी (Ayodhya Ram Mandir) अयोध्येत पोहोचले होते. क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सुद्धा मुंबईहून अयोध्येसाठी रवाना झाला आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ मुंबई विमानतळावरील आहे. याशिवाय महेंद्रसिंघ धोनी, रवींद्र जडेजा आणि रविशचंद्रन अश्विन यांनाही या सोहळ्याचे निमंत्रण मिळालं आहे.

याशिवाय अन्य खेळातील खेळाडू वेटलिफ्टर कर्णम मल्लेश्वरी, फुटबॉलपटू कल्याण चौबे, महिला क्रिकेटपटू मिताली राज, लांब पल्ल्याची धावपटू कविता राऊत तुंगार, बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, पीव्ही सिंधू, पॅरालिम्पिक भालाफेकपटू देवेंद्र झंजाडिया यांनाही या भव्य दिव्य राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण मिळाले आहे.

कधी आहे मुहूर्त – Ayodhya Ram Mandir

आज दुपारी १२.२० वाजता अभिजीत मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा सुरुवात (Ram Mandir Pran Pratishtha) होणार आहे. 12 वाजून 29 मिनिट आणि 08 सेकंद ते 12 वाजून 30 मिनिट आणि 32 सेकंद ८४ सेकंद चा शुभ मुहूर्त असणार आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरु असताना संपूर्ण अयोध्येवर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी होणार आहे. दुपारी २ नंतर विशेष आमंत्रितांना प्रभुरामांचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे.