Ayodhya Special Train: राम नवमीनिमित्त अयोध्येला विशेष ट्रेन सोडल्या जाणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| यावर्षी अयोध्येमध्ये (Ayodhya) राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडल्यामुळे रामनवमी (Ram Navami) मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. येत्या 9 ते 17 एप्रिल दरम्यान अयोध्येत रामनवमी उत्सव पार पडणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरातून भक्त रामनवमी साजरी करण्यासाठी अयोध्येला जातील. या पार्श्वभूमीवरच भारतीय रेल्वेकडून अयोध्येसाठी विशेष गाड्या (Ayodhya Special Train) सोडण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती, उत्तर रेल्वे लखनौ विभागाचे डीआरएम सचिंद्र मोहन शर्मा (Sachindra Mohan Sharma) यांनी ही माहिती दिली आहे.

सचिंद्र मोहन शर्मा यांनी माहिती दिली आहे की, रामनवमीची जय्यत तयारी सुरू असून सुमारे 20 लाख भाविक अयोध्येत पोहोचतील असा अंदाज आहे. पूर्वी अयोध्या धाम स्थानकात येणाऱ्या प्रवाशांची संख्या 4 हजार होती, आता त्यांची संख्या १८ हजार झाली आहे. यापेक्षा जास्त गर्दी होण्याची शक्यता असल्यास वेटिंग एरिया आणि प्रवाशांच्या सुविधांवर लक्ष ठेवले जाईल. रामनवमीनिमित्त लखनौ ते अयोध्या या विशेष गाड्या ताशी 130 किमी वेगाने धावतील. (Ayodhya Special Train)

खास म्हणजे, आता लखनौहून अयोध्येला जाण्यासाठी गाड्यांना कमी वेळ लागणार आहे. कारण लखनौ-अयोध्या मार्गावरील दुहेरी मार्ग आणि विद्युतीकरणाचे काम रेल्वे विभागाकडून पूर्ण झाले आहे. त्यामुळे लखनौ ते अयोध्येपर्यंत सुमारे 130 किमी प्रवास करणाऱ्या गाड्यांचा वेळ आता 30 ते 45 मिनिटांपर्यंत कमी होणार आहे. सध्या रामनवमीनिमित्त रेल्वे विभागाकडून गाड्यांचा वेळापत्रकाकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. (Ayodhya Special Train) जेणेकरून अयोध्या मार्गावरील गाड्या पूर्ण भरल्या असतील तर गाड्यांमध्ये अतिरिक्त डबे जोडून भाविकांचा प्रवास आरामदायी करता येईल.