व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

आयुर्वेद करेल तुमच्या दातांच्या समस्या दुर!! करा हे घरगुती उपाय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल लहानपणापासूनच मुलांना दाताच्या समस्या (Teeth Problems) भेडसावतात. जस- जसं वय वाढत जात तस – तसं हिरड्यांच्या समस्या समोर उभा ठाकतात. त्या दुर करण्यासाठी आपण एक चांगल्या डेंटिस्टकडे जातो. काही दिवस त्यावर उपाय करतो. मात्र बऱ्याचजनांना त्याचा फायदा होत नाही.  परंतु तुम्हाला आता चिंता करायची गरज नाही. कारण प्राचीन काळापासून वापरात असलेला आयुर्वेद तुमच्या या समस्या दुर करू शकतो. त्याचबद्दल आपण जाणून घेऊयात.  आयुर्वेदाची कमाल ही लाखो – करोडो काळापासून आहे. त्यातीलच दातांच्या मजबुतीसाठीचे काही मुख्य उपाय पुढीलप्रमाणे :

1) हळद :

हळद ही आयुर्वेदातील सर्वात महत्वाचा मानला जाणारा घटक आहे. हळदीत अँन्टी इंफ्लेमेटरी गुण असतात. ज्यामुळे आरोग्याला त्याचा फायदा होतो. हळद ही दातांना मजबूत करण्याचे काम करते. हळदीची पेस्ट हिरड्यांना लावल्याने त्यावर येणारी सुज ही कमी होऊन आराम मिळतो.

2) लवंग :

अनेक जाहिरातीमध्ये दाखवल्या जाणाऱ्या पेस्ट मध्ये लवंग हा घटक वापरला जातो. त्यामुळे दातांची मजबुती ही वाढते. लवंगात नैसर्गिक रुपात अँन्टी बॅक्टेरियल आणि अँन्टीव्हायरल गुण असतात. जे तुमच्या तोंडातून निघणारे हानिकारक बॅक्टेरिया दूर करतात. आणि दातांना मजबुती देतात.

3) लसूण :

लसूण हा पदार्थ खाण्यात वापरला जातो. यामध्ये अँन्ट इंफ्लेमेटरी प्रॉपर्टी ही मानवी शरीरातील इम्युन सिस्टिमला मजबूत करण्यास मदत करते. त्याचसोबत हिरड्यांची सूज कमी करण्यास मदत करते. जरी हा पदार्थ चविसाठी वापरला जात असला तरी याचे आयुर्वेदात प्रचंड फायदे आणि उपयोग पाहायला मिळतात. त्यामुळे दातांची मजबुती वाढवण्यासाठी लसूण अत्यंत उपयुक्त असे आहे.

4) कडुलिंब :

कडुलिंब आणि त्याची महती आपण फार पूर्वीपासून ऐकत आलो आहोत. जेव्हा पेस्ट या प्रकारचा उगम झाला नव्हता तेव्हा कडुलिंब दातांच्या स्वच्छतेसाठी वापरले जायचे. आणि त्यामुळे दातांची मजबुती टिकून राहायची. कडुलिंबात अँन्टी बॅक्टेरियल, एस्ट्रिंजेंट आणि एंटीसेप्टिक हे गुण असल्यामुळे त्याचा आजही ग्रामीण भागात वापर होतो.

5) पुदीना :

पुदीना हा पाणीपुरी सारख्या पदार्थात हमखास वापरला जातो. त्यामुळे पदार्थाला एक वेगळीच चव येते. हे जरी खरे असले तरी दातांच्या फायद्यासाठी पुदीना हा महत्वाचा घटक आहे. यामध्ये  विशिष्ट प्रॉपर्टीज अँन्टी बॅक्टेरियल, अँन्टी इंफ्लेमेटरी आणि अँन्टी फंगल आहे जे ओरल हेल्थसाठी फायदेशीर ठरतात. तसेच पुदीना हा तोंडाला येणारी दुर्गंधी दुर करतो. तसेच पुदीन्याची पाने रोज खाल्याने दातांची स्वछता होते आणि दातही मजबूत होतात.