Ayushman Bharat Yojana | राज्य सरकारने केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी विविध योजना आणल्या जातात. नागरिकांच्या हिताचा आणि आर्थिक विचार करून या योजना आणल्या जातात. अशातच केंद्र सरकारने आयुष्मान भारत योजना (Ayushman Bharat Yojana ) चालू केलेली आहे. या योजनेअंतर्गत देशातील नागरिकांना शस्त्रक्रिया त्याचप्रमाणे विविध आजारांवर पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार केंद्र सरकारकडून दिले जाते. अशातच आता केंद्र सरकारने या योजनेमध्ये एक मोठा बदल केलेला आहे. तो म्हणजे आता आयुष्मान भारत या योजनेअंतर्गत 70 वर्षावरील वृद्ध देखील लाभ घेऊ शकतात. त्यामुळे आता या योजनेबद्दल चांगलीच चर्चा रंगली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आधी आयुष्मान कार्ड काढावे लागेल आणि त्या कार्डनुसार तुम्हाला केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या रुग्णालयांमध्ये तुम्हाला मोफत उपचार घेता येईल.
परंतु आता या आयुष्यमान भारत योजनेचा (Ayushman Bharat Yojana ) लाभ एका कुटुंबातील किती व्यक्ती घेऊ शकतात किंवा आयुष्मान काढ हे एकाच कुटुंबातील किती व्यक्ती बनवू शकतात? ही एक खूप मोठी शंका सगळ्यांच्या समोर उभी राहत आहे. त्यामुळे अनेक लोकांना या योजनेचा लाभ घेता येत नाही. परंतु या योजनेअंतर्गत जे काही नियम आहेत. ते नियम सरकारने आधीच सांगितलेले आहे. त्यामुळे हे आयुष्मान काळ हे कुटुंबनिहाय काढले जाणार आहेत. या योजनेत सगळ्या गरजू लोकांना लाभ घेता येणार आहे. म्हणजेच एका कुटुंबातील सर्व व्यक्ती या आयुष्मान कार्ड योजनेचा लाभ घेऊ शकतात. म्हणजेच ते या योजनेसाठी पात्र असतील.
34 कोटींपेक्षा जास्त कार्ड तयार |Ayushman Bharat Yojana
सध्या या आयुष्मान भारत योजनेचा प्रसार खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्यामुळे अनेक लोक या योजनेचा लाभ घेत आहेत. सरकारने दिलेल्या माहितीनुसार 30 जून 2024 पर्यंत 34.7 कोटींपेक्षा जास्त आयुष्यमान कार्ड तयार झालेले आहेत. या कालावधीतच 1 लाख कोटी रुपयांपर्यंतच्या 7.37 कोटी आजारी लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेली आहे.
पात्रतेचे निकष
या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणताही नागरिक हा ग्रामीण भागातील रहिवासी किंवा अनुसूचित जाती जमातीचा असावा. यामध्ये अपंग, असंघटित क्षेत्रात काम करणारे लोक, रोजंदारी मजूर लाभ घेऊ शकतात.
आयुष्मान कार्ड कसे काढाल?
- हे आयुष्मान कार्ड काढण्यासाठी तुम्हाला सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
- यानंतर होम पेजवर तुम्ही मी पात्र आहे का या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर त्यात टाका.
- मोबाईल नंबर टाकल्यावर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल तो ओटीपी भरा.
- त्यानंतर स्क्रीनवर तुमचे राज्य मोबाईल नंबर रेशन कार्ड नंबर टाका.
- आणि त्यानंतर सगळी माहिती सबमिट करा.