हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | 2025 हे वर्ष सुरू होण्यासाठी आता काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत. आणि 2025 चे स्वागत करण्यासाठी सगळेजण तयार आहेत. प्रत्येक जण नवनवीन प्लॅन्स तयार करत आहेत. 2025 मध्ये कोणत्या गोष्टी करायच्या आहेत? हे देखील ठरवत आहेत. अनेक ज्योतिष देखील 2025 बद्दल भविष्यवाणी करत आहेत. यापूर्वी देखील अनेकांनी भविष्यवाणी केलेली आहे. आणि ते खरी देखील ठरलेली आहे. पण बिल्गेरी येथील अंध जोतिष बाबा वेंगा यांची भविष्यवाणी आतापर्यंत नेहमीच ठरलेली आहे. आणि त्यांनी काही वर्षांपूर्वी 2025 साठी देखील भविष्यवाणी केली आहे. 2025 मध्ये जग हादरून जाईल अशी भविष्यवाणी त्यांनी केली होती. आता त्याबद्दल आपण जाणून घेऊया.
बाबा वेंगा यांनी अनेक वर्षांपूर्वी 2025 साठी एक मोठी भविष्यवाणी केली होती. त्यामुळे आता नक्की2025 मध्ये काय होणार आहे? अशी चर्चा सगळ्यांमध्ये चालू झालेली आहे. त्यांनी केलेल्या भविष्यवाणीत 2025 मध्ये एक मोठे महायुद्ध होणार आहे. त्याचप्रमाणे युरोपात इस्लामिक सत्ता येऊन पृथ्वीवरील मनुष्य प्राणी नष्ट होण्याची भविष्य वाणी त्यांनी केली होती. युरोपमध्ये एक मोठा संघर्ष सुरू होऊन मानव जातीच्या विनाशाची सुरुवात होईल. आणि हा संघर्ष जास्त प्रमाणात पेटणार असल्याची भविष्य वाणी बाबा वेंगा यांनी केलेली आहे. तसेच 5079 मध्ये पृथ्वीवरून मानव जात नष्ट होण्यात असल्याचे भाग्यदेखील त्यांनी केले होते
या संघर्षामुळे महाद्वीप मधील लोकसंख्या कमी होणार आहे. आणि 2025 मध्ये अशी एक भयानक घटना घडणार आहे. जी मानव जातीच्या विनाशाचे कारण होणार आहे. असे त्यांनी सांगितले होते. आता 2025 येण्यासाठी काही दिवसच शिल्लक असल्याने बाबा वंगा यांनी केलेली भविष्यवाणी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तसेच त्यांची ही भविष्यवाणी खरी ठरणार तर नाही ना? अशी चिंता देखील व्यक्त केली जात आहे.