Babandada Shinde : अजित पवारांना मोठा झटका !! बबनदादा शिंदेनी साथ सोडली, तुतारी फुंकणार

Babandada Shinde Tutari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांना (Ajit Pawar) मोठा झटका बसला आहे. माढ्याचे आमदार बबनदाद शिंदे (Babandada Shinde) यांनी अजित पवार गटाला सोडचिठी दिली आहे. आपल्या मुलाला एकवेळ शरद पवारांच्या तुतारीवर (Sharad Pawar) लढवू किंवा वेळ पडल्यास अपक्ष उभा करू अशी भूमिका बबन दादा शिंदे यांनी घेतली आहे. बबनदादा शिंदे हे मध्यातून तब्बल ६ वेळा आमदार झाले आहेत. मात्र यंदा त्यांनी निवडणुकीतून माघार घेत आपला मुलगा रणजित शिंदे याना उभं करणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केलं होते.

मागील काही दिवसांपूर्वी बबनदादा शिंदे आणि रणजित शिंदे यांनी ३ वेळा शरद पवारांची भेट घेतली होती, तेव्हापासूनच ते शरद पवार गटात प्रवेश करतील अशा चर्चा सुरु होत्या. मी शरद पवारांच्या साथीने 38 वर्षे राजकारण करीत आलोय. त्यामुळे मी शरद पवारांची भेट घेतली आहे. शरद पवारांकडे तिकीटाची मागणी केली आहे. ते तिकीट देतील की नाही हे मला माहिती नाही. पण यंदाच्या निवडणुकीत माझा मुलगा रणजितसिंहला शरद पवारांनी तिकीट दिले तर ठिक, नाहीतर अपक्ष निवडणुकीला सामोरे जाईल”, महायुतीचा विषय आमच्यासाठी संपलाय अशी भूमिका बबनराव शिंदे यांनी घेतली आहे .आमदारांचे पुतणे धनराज शिंदे हे बंडखोरी करत असल्याचे निदर्शनास सांगताच आमचा घरचा विषय सुद्धा संपला असल्याचे आमदार शिंदे यांनी सांगितले. तसेच

दरम्यान शरद पवारांनी रणजीत शिंदे यांना तुतारी न दिल्यास राष्ट्रवादी अर्थात घड्याळावर उभे न राहता अपक्ष निवडणूक रिंगणात उतरवण्याची भूमिका बबनदादांनी घेतल्याने आता अजितदादांच्या घड्याळाचा उमेदवार कोण हा प्रश्न निर्माण झालाय. महायुतीत शिवसेनादेखील या मतदारसंघावर दावा करत आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू या मतदारसंघात निवडणूक लढवण्याची तयारी आखत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे माढ्यात माहुयुतीत काहीच आलबेल नाही हे आता समोर आलं आहे.