हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 विश्वचषक स्पर्धेत आपल्या सुमार कामगिरीने स्पर्धेबाहेर पडलेल्या पाकिस्तानच्या संघाला आधीच टीकाकारांना सामोरे जावं लागत आहे. त्यातच आता कर्णधार बाबर आझमवर (Babar Azam Match Fixing Allegation) मॅच फिक्सिंगचे आरोप करण्यात आल्याने पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पाकिस्तानचे ज्येष्ठ पत्रकार मुबशीर लुकमान यांनी हा खळबळजनक आरोप केला आहे. बाबर आझमने अमेरिका विरुद्धचा सामना फिक्स केला होता असं त्यांचं म्हणणं आहे. अमेरिकेविरुद्धचा सामना हरण्यासाठी बाबरला महागड्या भेटवस्तू मिळाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
सोशल मीडियावर मुबशीर लुकमान यांचा एक विडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते म्हणतात कि, बाबर आझम यांना अमेरिकेकडून महागड्या भेटवस्तू मिळाल्या आहेत. अमेरिकेविरुद्धचा सामना हरण्यासाठी त्याला या भेटवस्तू मिळाल्या. या T20 विश्वचषकात पाकिस्तानचा हा पहिलाच सामना होता आणि तो येथे टाय झाला, त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेने पाकिस्तानवर मात केली. लुकमानचा दावा आहे की बाबरला सट्टेबाजांकडून एक ऑडी कार मिळाली आहे, जी तो त्याच्या भावाकडून भेट असल्याचे सांगत आहे. त्याने सांगितले की बाबरची ऑडी ई-ट्रॉन, जी त्याने त्याला त्याच्या भावाकडून भेट म्हणून दिली होती, ती संशयास्पद बुकींकडून विकत घेतली होती, तर त्याला ऑस्ट्रेलिया आणि दुबईमध्ये अपार्टमेंट देखील मिळाले होते. बाबरचा भाऊ 7-8 कोटींची कार त्याला गिफ्ट का करेल? असा सवालही त्यांनी केला आहे.
दरम्यान, एकेकाळच्या चॅम्पियन असलेल्या पाकिस्तानला यंदाच्या T20 विश्वचषक स्पर्धेत मोठया नामुष्कीचा सामना करावा लागला. अमेरिकेविरुद्व पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा धक्कादायक पराभव झाला. त्यानंतर कट्टर प्रतिस्पर्धी भारताने सुद्धा पाकड्याना लोळवले. या २ पराभवानंतर पाकिस्तानने कॅनडा आणि आयर्लंड विरुद्ध विजय मिळवला मात्र दोन्ही वेळेस त्यांना निकराची लढत द्यावी लागली. आणि सुपर 8 साठी पाकिस्तानचा संघ पात्र होऊ शकला नाही. त्यामुळे आजी माजी क्रिकेटपटूनी पाकिस्तानी खेळाडूंवर आपलं तोंडसुख घेतलं, त्यातच आता कर्णधार बाबर आझमवर मॅच फिक्सिंगचे आरोप झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.