जेष्ठ आझाद हिंद सैनिक बाबुमियाँ फरास यांचे निधन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | विजय मांडके

सातारा जिल्ह्यातील जेष्ठ व वयोवृद्ध आझाद हिंद सैनिक व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे सहकारी इब्राहिम उमर ऊर्फ बाबुमियाँ फरास (९८) यांचे अल्प आजार व वृद्धापकाळाने सातारा येथे खाजगी रूग्णालयात ऊपचार घेताना निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेकांनी त्यांच्या शनिवार माची पेठेतील निवासस्थानी जाऊन अंत्यदर्शन घेतले. त्यांच्या पार्थिवावर गेंडामाळ येथील कब्रस्तान दफनभूमी येथे शनिवारी सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
रासबिहारी बोस यांच्या प्रेरणेने ते आझाद हिंद सेनेत ते दाखल झाले होते. कॅप्टन मोहनसिंग, प्रीतमसिंग यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी आझाद हिंद फौजेचे काम केले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी त्यांची अनेकदा प्रत्यक्ष भेट व चर्चाही झाली होती. ब्रिटिशांनी त्यांना कैद करून मुलदान जेलमध्ये दाखल केले होते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्या जीवनावर विशेष परिणाम झाला होता.

बाबूमिया फरास त्यांच्या शेवटच्या दिवसांत

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी सातारा जिल्हा स्वातंत्र्य सैनिक संघटना बांधणी मध्ये जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक सोपानराव घोरपडे, बाबुराव जंगम गुरुजी, गुलाबराव फडतरे, महिताब शेख, जगन्नाथ देशपांडे, बापुराव मोहिते यांच्या सहकार्याने विशेष लक्ष घातले.
सातारा येथील नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारण्यात मोलाचा वाटा होता.
त्यांना दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ताम्रपट व सन्मान पत्र देवुन स्वातंत्र्य चळवळीत दिलेल्या योगदानाबद्दल गौरवले होते. सातारच्या राजघराण्याशी त्यांचे निकटचे व कौटुंबिक संबंध होते.

Leave a Comment