Baby Born With Tail | 4 इंच लांब शेपटीसह बाळाचा जन्म, डॉक्टरांनाही बसला आश्चर्याचा धक्का

Baby Born With Tail
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Baby Born With Tail | सोशल मीडिया हे कसे ठिकाण आहे जिथे जगभरातल्या गोष्टी आपल्याला कळत असतात. अशातच एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. ती म्हणजे एका नवजात बाळाला चक्क 9 इंच लांब शेपटी आहे. हे पाहून डॉक्टर देखील आश्चर्यचकित होत आहेत. या मुलाचा फोटो सध्या इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. काही लोक याला चमत्कार म्हणत आहे, तर काहीजण म्हणत आहेत की हा आजार आहे.

व्हायरल झालेला हा फोटो चीनमधील आहे. जिथे एका हॉस्पिटलमध्ये 4 इंच लांब शेपटीसह बाळ जन्मलेले आहे. त्यामुळे हा चर्चेचा विषय आहे. यावेळी डॉक्टर म्हणाले की, “हि अत्यंत दुर्मिळ घटना आहे. शेपूट घेऊन जन्मलेले बाळ फारच (Baby Born With Tail) दुर्मिळ आहे. काही विशेष परिस्थितीमुळे असे होऊ शकते. काही अवयवांचा विकास खूप वेगाने होतो आणि प्रक्रिया थांबवता येत नाही. आधी आम्हाला शंका होती की कदाचित मुलाच्या पाठीचा कणा बांधला असेल. जो शेपटीसारखा दिसत होता. परंतु जेव्हा मुलाच्या मणक्याचे एमआरआय स्कॅन केले तेव्हा त्याची शंका बरोबर निघाली.”

डॉक्टरांच्या मते जेव्हा आपल्या पाठीचा कणा हा सभोवतालच्या उतीसोबत जोडलेला असतो. तेव्हा मानवामध्ये ही बद्ध रीड हड्डी वाढते. सहसा ती मणक्याच्या पायाशी जोडलेली असते. यामुळे अनेक प्रकारच्या निरोलॉजिकल समस्या देखील उद्भवतात.

डॉक्टर आणि सोशल मीडियावर एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये एका नवजात बाळाच्या पाठीला 4 इंच लांब शेपटी (Baby Born With Tail) दिसत आहे. चीनमध्ये शेपूट असलेल्या मानवी बाळाचा जन्म होणे ही काही पहिलीच घटना नाही. चीनमध्ये दहा वर्षांपूर्वी म्हणजेच 2024 मध्ये देखील अशीच एक घटना घडली होती. तिथे एका मुलाच्या शेपटी जन्मानंतर पाच महिन्यांनी बाहेर आली होती.

जन्माच्या वेळी बाळाच्या पाठीच्या करण्याच्या मध्यभागी हे एक अंतर राहिल्याने हा प्रकार घडला होता. मुलाच्या आईच्या लक्षात आले की, एक शेपटी बाहेर आली आहे. जी नंतर 5 इंच वाढली. आईने डॉक्टरांना ती शेपटी काढून टाकण्याची देखील विनंती केली होती. परंतु ती शेपटी मुलाच्या मज्जासंस्थेची जोडलेली होती. त्यामुळे ती काढून टाकल्यास गंभीर समस्या उद्भवू शकते. असे देखील डॉक्टरांनी सांगितले होते. ती शेपटी काढण्यास नकार दिला होता.