हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या पावन भूमीत दिव्यांग कल्याण मुद्दा कायम दुर्लक्षित व्हावा हे जरा भुवया उंचावणारं आहे पण याच बांधवांच्या कल्याणासाठी आपलं आयुष्य समर्पित करणारा माणूस म्हणजे आमदार बच्चूभाऊ कडू (Bacchu Kadu) होय. पुण्याच्या सरकारी कार्यालयात एका दिव्यांग बांधवांना मिळालेल्या दुय्यम वागणुकीने त्यांच हृदय ढवळून निघालं. आणि तिथूनच आरंभ झाला दिव्यांग बांधवाना त्यांचे हक्क मिळवून देण्याच्या निर्धाराचा. देहू ते वर्षां बंगला असं त्यांनी दिव्यांग बांधवांच प्रथम आंदोलन केलं. ज्याचं नाव होतं प्रहार अपंग क्रांती आंदोलन . विखूरलेल्या दिव्यांग बांधवांना बच्चूभाऊ कडू यांच्या रूपाने पहिले सक्षम नेतृत्व मिळाले.
त्यांच्या या आंदोलनाची दखल अखेर केंद्र सरकारलाही घ्यावी लागली. त्यांच्या आंदोलनाचं फलित म्हणजे 1995 साली संजय गांधी निराधार योजनेचा मासिक हप्ता 600 रुपयावरून 1000 रुपयांपर्यंत गेला. दिव्यांग बांधवासाठीचा 3% राखीव निधी 5% पर्यंत गेला. 1995 च्या अपंग पुनर्वसन कायद्याची कडक अंमलबजावणी सुरु झाली. ग्राम पंचायत, नगर परिषद, महानगरपालिका येथे 3% निधी, 3% गाळे वाटप, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 3% आरक्षण या सर्व हक्कांना नवसंजीवनी मिळाली.
https://www.facebook.com/reel/3680621232187851
दिव्यांग बांधवासाठी करत असलेल्या धडक आंदोलनामुळे त्यांच्यावर 350 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहे. बच्चू भाऊंच्या या सर्व कार्याची पोचपावती म्हणजे महाराष्ट्र राज्य सरकारने स्थापन केलेलं दिव्यांग मंत्रालय होय. आजही बच्चूभाऊ कडू यांचा आवाज दिव्यांग बांधवासाठी महाराष्ट्र विधानसभेत घुमतो आहे. दिव्यांगांसाठी झटणाऱ्या अशा या दमदार नेतृत्वाची आता फक्त अपंगानाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला गरज आहे.