वारं फिरणारच प्रहार लढणारच, रयतेचं सरकार येणारच ..!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकऱ्यांना, गोरगरिबांना, अपंगाना, दीनदुबळ्यांना नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला आता ज्यांची गरज आहे जाणून घेऊया त्या लोकनायकाबद्दल… बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्याबद्दल.. बच्चू कडू यांचे नाव ओम प्रकाश बाबाराव कडू, त्यांचा जन्म 5 जुलै 1970 साली झाला. त्यांनी युवकांचे संघटन तयार करून शेतकरी दिव्यांग आणि स्थानिकांचे अनेक प्रश्न त्यांनी आक्रमकपणे समोर आणले. आपल्या अभिनव आंदोलनातून बच्चू कडू महाराष्ट्रात विशेष प्रसिद्ध आहे. 2019 मध्ये स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये बच्चू कडू यांनी शिवसेनेच्या कोट्यातून जलसंपदा व लाभक्षेत्र विकास ,शालेय शिक्षण, महिला व बालविकास ,इतर मागासवर्ग सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग ,विमुक्त जाती ,भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार या खात्याच्या राज्यमंत्री पदाची शपथ 30 डिसेंबर 2019 रोजी घेतली होती.

महाराष्ट्रामध्ये ते बच्चुभाऊ या नावाने लोकप्रिय आहेत. आमदार बच्चू कडू यांचे जीवन संघर्षाने भरलेले आहे.गरीब, अज्ञान, पीडित, अपंगांचे यांचे दुःख सोबतीला घेऊन संवेदना हरविलेल्या व्यवस्थेशी बच्चु भाऊ झुंजत आहे. कुठल्याही पदाची लालसा किंवा त्यांची अपेक्षा न बाळगता उपेक्षितांचे अश्रू पुसून आनंदाचं सुख त्यांच्या ओंजळीत देणं हे बच्चूभाऊंच्या जीवनाचं ध्येय. आज-काल संघटना कमी होत चालली आहे माणसं एकत्र येत नाहीत, लढत नाहीत अशा काळात प्रहारच्या माध्यमातून बच्चू कडू यांनी खूप मोठ संघटन उभारलं आहे. बच्चू कडू यांचं दिव्यांगासाठी करत असलेले काम अतिशय प्रेरक आहेत ते संत गाडगेबाबांचा वारसा नेटाने चालवत आहेत.

बच्चू कडू म्हणतात परिवर्तनाची सुरुवात ही स्वतःपासून झाली पाहिजे कुठलाही सकारात्मक बदल आधी स्वतःमध्ये झाला पाहिजे मग आजूबाजूची परिस्थिती आपोआप बदलायला लागते. अनाथ अपंग विधवा वृद्ध व माझा खचलेला शेतकरी अजिबात वंचित राहता कामा नये मग माझा देह शेवटपर्यंत त्यांच्यासाठीच झीजत राहीला तरी चालेल. बच्चू कडू म्हणजे अचलपूर विधानसभा मधून सलग चार वेळा बिनविरोध निवडून आलेले लोकनायक. बच्चू कडू हे अन्यायाविरुद्ध पेटून उठतात, बच्चू कडू यांना शेतकरी मायबाप जनतेचा कैवारी, रुग्णांचा मसीहा अपंगाचा आधारस्तंभ असं कित्येक नावांनीसंबोधलं जातं. बच्चू कडू हे हटके आंदोलन करण्यासाठी देशभरात प्रसिद्ध आहेत. अश्या या बच्चू कडूंची आता फक्त विदर्भाला नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला गरज आहे. आता जनतेलाही हवे आहेत महाराष्ट्रासाठी बच्चू कडू !