सचिनच्या जुगाराच्या जाहिरातीवर बंदी घाला; बच्चू कडूंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या भारताचा मास्टर ब्लाटर सचिन तेंडुलकर PayTM फर्स्टच्या जाहीरातीत चांगलाच झळकत आहे. मात्र आता याच जाहीरातीमुळे तो वादाच्या भोवऱ्यात अकडला आहे. भारताच्या नामांकित क्रिकेटपडूने अशी जुगाराच्या अँपची जाहीरात करु नये असे आवाहन एका खुल्या पत्राद्वारे आमदार बच्चू कडू यांनी केले आहे. त्यांनी हे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले असून यावर त्वरीत कारवाई करावी अशी मागणी बच्चू कडू यांनी आपल्या पत्रात केली आहे.

यासंदर्भात बच्चू कडू यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी, सचिन तेंडूलकर पेटीएम फर्स्टसारख्या जाहिराती करत असल्यामुळे त्यांच्यावर आक्षेप नोंदवत प्रितेश पवार नावाच्या तरुणाने तक्रार केल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे सचिनची ही जाहिरात त्वरीत बंद करण्यात यावी अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे.यासंदर्भात त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांना पत्र पाठविले आहे. या पत्रात त्यांनी सचिनची टीव्हीवरील ही जाहीरात बंद करण्यात यावी अशी विनंती शासनाकडे केली आहे.

पेटीएमसारख्या अँपमधून रम्मी सारखे गेम ओपन होतात. या गेममुळे अनेक तरुण कर्जबाजारी झाले आहेत. तर अनेकांनी आत्महत्या केल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. या गेमच्या माध्यमातून अनेक जणांची फसवणूक देखील झाली आहे. त्यामुळे या गेमवर आंध्र प्रदेश,आसाम, अरुणाचल प्रदेश, तेलंगणामध्ये बंदी घालण्यात आली आहे. रम्मी गेम ही जुगार सारखी खेळली जाते. मुख्य म्हणजे अशा गेमची जाहिरात भारतरत्न सचिन तेंडुलकर करत आहे. हे त्याच्या प्रतिमेला शोभणारे नाही. अशा जाहीराती केल्यामुळे लोकांवर याचा चुकीचा परिणाम होतो. त्यामुळे ही  जाहीरात तात्काळ बंद करण्यात यावी अशी मागणी बच्चू कडू यांनी पत्रात केली आहे. तसेच त्यांनी सचिन तेंडुलकर याला देखील विनंती करत जाहीरात बंद करण्यास सांगितले आहे.

दरम्यान, सचिन तेंडुलकर करत असलेल्या जाहीरातीमध्ये दाखवण्यात आले आहे की, नेट प्रॅक्टीस दरम्यान एक छोटा क्रिकेटर आपला खेळ सोडून दुसऱ्यांना चिअर अप करत असतो. त्यामुळे त्याचे कोच त्याच्या जोरात कानाखाली मारत तुला खेळायचे आहे की चेअरअप करायचे आहे असा प्रश्न विचारतात. यानंतर त्याचा मित्र त्याला दुसऱ्या कोचकडे घेऊन जातो. पण तो मुलगा परत आपल्या कोचकडे येत मला खेळायचे असल्याचे म्हणतो. यानंतर ‘योग्य वेळी योग्य निर्णय घेणे महत्वाचे असते’ असे सचिन तेंडुलकर म्हणताना दिसतो.