Back Pain | सातत्याने होत असणाऱ्या पाठदुखीकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, असू शकते कॅन्सरचे कारण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Back Pain| आजकाल अनेक लोक ऑफिस काम करतात. त्यामुळे कितीतरी तासान तास बसून ते काम करत असतात. परंतु यामुळे त्यांना पाठ दुखीची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवते. स्त्रियांमध्ये देखील आजकाल पाठदुखीचे प्रमाण अधिक वाढत चाललेले आहे. परंतु पाठदुखी ही एक सामान्य समस्या आहे. असा विचार करून लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु जर एक महिन्यांपेक्षा जास्त वेळ तुमची पाठ सातत्याने दुखत असेल आणि तुम्हाला खूप वेदना होत असेल. तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. आणि सावधानगिरी बाळगा जेणेकरून पुढे होणारे नुकसान कमी होईल.

जर तुम्हाला पाठदुखी सोबत वजन कमी होणे, ताप, लघवी थांबणे, पचन न होणे यांसारख्या समस्या असतील तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. कारण ही सगळी कॅन्सरची लक्षणे आहेत .कर्करोगाच्या पेशी शरीरात पूर्णपणे पसरतात. त्यामुळे पाठदुखी हा आजार देखील चालू होतो. त्यामुळे पाठदुखी हे कर्करोगाचे मुख्य कारण असू शकते. आता यामुळे कोणकोणते कॅन्सर होतात हे आपण पाहूया

फुफ्फुसाचा कर्करोग

फुफुसाच्या कर्करोगामुळे जगभरात आत्तापर्यंत अनेक मृत्यू झालेले आहेत. ज्या लोकांना कॅन्सर होतो त्या लोकांची ही समस्या पाठदुखी पासून सुरू होते तयार होते. आणि ती गाठ पाठीच्या कानाला दाबू लागते तेव्हा पाठ दुखी मोठ्या प्रमाणात सुरू होते.

स्तनाचा कर्करोग

स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग ही अतिशय सामान्य आणि प्रमुख प्रकारचा कर्करोग आहे. हा कर्करोग हळूहळू हाडांपर्यंत पोहोचतो. ज्यामुळे पाठ दुखी होते. प्रामुख्याने पाठ आणि खांद्याच्या वरच्या भागात वेदना चालू होतात.

प्रोटेस्ट कर्करोग

प्रोटेस्ट कर्करोगामुळे पाठदुखीचा त्रास चालू होतो. पाठीचा कणा आणि आजूबाजूच्या भागात गाठ निर्माण होते. आणि त्यामुळे हा कर्करोग चालू होतो. 50 वर्षानंतर पुरुषांमध्ये हे अगदी सामान्य आहे. त्यामुळे त्यांना लघवीचा त्रास होतो, आणि रक्तस्त्राव देखील होतो.

स्वादुपिंडाचा कर्करोग | Back Pain

स्वादुपिंडचा कर्करोग असेल, तर त्याचा टयुमर पाठीच्या कण्याला दाबल्यामुळे वेदना सुरू होतात. त्यामुळे पाठ दुखीचा त्रास सुरू होते. म्हणून या आजाराकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. अन्यथा पुढे जाऊन त्याचे तुम्हाला खूप भयानक परिणाम भोगावे लागतील.