Bad Breath Remedies | श्वासाच्या दुर्गंधीमुळे त्रास होत असेल, तर आजच फॉलो करा ‘हे’ घरगुती उपाय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Bad Breath Remedies | अनेकवेळा आपण पाहतो की, आपल्या श्वासाची आणि तोंडाची दुर्गंधी येते. अनेक व्यक्तींमध्ये ही समस्या येते. या समस्येचे मुख्य कारण म्हणजे तोंड व्यवस्थित साफ न करणे. हेच आपल्या श्वासातून दुर्गंधी येण्याचे खरे कारण आहे. अनेकवेळा आपण जेवनात कांदा किंवा लसूण खातो आणि तो खाल्ल्यानंतर आपल्या तोंडाचा बराच वेळ वास राहतो आणि तो वास अजूबाजूच्या लोकांना सहन करावा लागतो.

कधी कधी आपल्या पोटाच्या समस्येमुळे देखील आपल्या श्वासाची दुर्गंधी येते. जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. परंतु घरच्या घरी जर तुम्हाला श्वासाच्या दुर्गंधी टाळायची असेल तर त्यासाठी काही मार्ग जाणून घेऊया. (Bad Breath Remedies)

श्वासाची दुर्गंधी टाळण्याचे उपाय | Bad Breath Remedies

  • जास्त वेळ तोंड कोरडे ठेवू नका. दिवसभर ताजे राहण्यासाठी जास्तीत जास्त पाणी किंवा इतर कोणतेही पेय त्या फक्त ते आपल्या आरोग्यासाठी हानिकारक नसावे.
  • जेवणानंतर वेलचीचे छोटे दाणे किंवा दालचिनीचा तुकडा तोंडात चघळत बसा. असे केल्याने तुमच्या तोंडातील लाळेमुळे तुमच्या अन्न सहज पचेल आणि तुमच्या तोंडाची दुर्गंधी देखील येणार नाही.
  • रोज सकाळी आणि संध्याकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस पिळा. त्यामुळे तोंडातील कोणत्याही प्रकारची दुर्गंधी येणार नाही.
  • त्याचप्रमाणे तोंडातील दुर्गंधीपासून (Bad Breath Remedies)आराम मिळवायचा असेल तर तमालपत्र चहा घ्या. यासाठी तुम्हाला चार तमालपत्र पाण्यात काहीवेळ उकळावी लागेल. नंतर ते फिल्टर द्वारे गाळून घ्यावे लागेल. नंतर ते पाणी प्या.
  • कोथिंबीर भाजून बारीक करून त्यात थोडे काळे मीठ टाकल्यानंतर टाकून खाल्ल्यानंतर देखील तोंडाचा वास येत नाही.
  • दिवसातून एकदा तरी कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्या.
  • तुळशीची पाने पाण्यात उकळून त्यात थोडे मीठ टाकून आणि दिवसातून ते त्यामुळे श्वासाची दुर्गंधी बंद होण्यास मदत होते.
  • त्याचप्रमाणे श्वासाच्या दुर्गंधीपासून (Bad Breath Remedies) मुक्तता हवी असेल तर दररोज आपले तोंड स्वच्छ करा. यासाठी रोज सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करा. तोंड स्वच्छ धुवा जास्त काळ उपाशी राहू नका आणि भरपूर पाणी प्या.