Badlapur Case : भय इथले संपत नाही ! बदलापुरात शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर अत्याचार,आत्तापर्यंत काय घडलं?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Badlapur Case : संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या कोलकता येथील शिकावू डॉक्टरच्या हत्येनंतर आता महाराष्ट्रातून एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. बदलापूर पूर्व मधील एका नामांकित शाळेत दोन चिमूरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे अख्खा महाराष्ट्र हादरून गेला असून ज्या मुलींना काहीही समजत नाही अशा अजाणत्या वयातच या दोन चिमुकल्यांना असंख्य वेदना सोसाव्या लागल्यामुळे बदलापूरकर आरोपीला फाशीची शिक्षा करण्याची मागणी करत आहेत. बलापूरकरांनी प्रशासनाला यामुळे चांगलंच धारेवर धरलं असून चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या क्रूर (Badlapur Case) नराधमाला फासावर लटकवा असा एकच सूर लावून धरला आहे.

या घटनेनंतर संतप्त बदलापूरकरांनी शाळेच्या समोर ठिय्या आंदोलन केलं ही गोष्ट एवढ्यावरच थांबली नाही तर शाळेची तोडफोड करण्यात आली आहे. शिवाय बदलापुरातील मुख्य रेल्वे मार्गावर देखील आंदोलन (Badlapur Case) करण्यात आलं आहे

दरम्यान याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी खटला फास्टट्रॅकवर चालवण्याचे आश्वासन दिले असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल असेही सांगितले आहे. तरीदेखील बदलापूरकरांचा रोष काही कमी होताना दिसत नाहीये. बदलापूरकरांनी रेल्वे ट्रॅकवर आंदोलन करीत असताना तेथे आलेल्या पोलिसांवर देखील दगडफेक केल्याची घटना घडली आहे. पोलीस सर्व परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र बदलापूरकरांकडून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी ही एकच मागणी करण्यात येत (Badlapur Case) आहे.

याप्रकरणी शाळेतील संबंधित मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आलं असून मुलांची जबाबदारी असलेल्या दोन सेविकांना देखील सेवेतून कमी करण्यात आला आहे. काही साजग नागरिकांकडून शाळेविरुद्ध आंदोलन करण्यात येत आहे. आता प्रशासनाकडून याची गंभीर दखल घेण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं (Badlapur Case)

बदलापूरच्या एका नामांकित शाळेमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. यापैकी एक मुलगी चार वर्षाची तर दुसरी सहा वर्षाची असल्याची माहिती मिळत आहे. शाळेमध्ये नुकतेच सफाई कामगार म्हणून रुजू झालेल्या अक्षय शिंदे नावाच्या 23 वर्षाच्या नराधमाने हे अमानवी कृत्य केल्याची घटना घडली आहे. 12 ऑगस्ट रोजी ही घडलेली घटना आहे. अक्षय शिंदे हा एक ऑगस्ट रोजी कंत्राटी पद्धतीने कामावर रुजू झाला होता. मुलींच्या स्वच्छतागृहांची सफाई करणाऱ्या या आरोपीने त्याच्या कामाचाच गैरफायदा घेत मुलींवर (Badlapur Case) अत्याचार केला.

12 ऑगस्ट दिवशी एका मुलीने शाळेतून घरी गेल्यानंतर तिच्या पालकांकडे तक्रार केली. “आई मला शुच्या जागी मुंग्या चावतायत…” असं त्या कोवळ्या मुलीचं वाक्य होतं. सातत्याने ही मुलगी तिच्या पालकांकडे तक्रार करू लागल्याने पालकांना संशयाला आणि त्यांनी मुलीला विश्वासात घेत विचारणा केली. त्यावेळी तिने शौचालयात गेली असता अक्षय शिंदे नावाच्या नराधमाना तिच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श केल्याचे उघड झालं. त्यानंतर पालकांनी त्याच वर्गातील दुसऱ्या मुलीच्या पालकांशी संपर्क साधला नुकतीच त्यांची मुलगी ही शाळेत जायला घाबरत असल्याचं समजलं होतं. दोन्ही मुलींची अवस्था ही संशयास्पद असल्याने पालकांनी तात्काळ स्थानिक डॉक्टरांकडे तपासणी करण्याचे ठरवलं आणि तपासणीनंतर शाळेतीलच नराधमान त्यांच्यावर लैंगिक अत्याचार (Badlapur Case) केल्याचे उघडकीस आलं.

पोलिसांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न

मिळालेल्या माहितीनुसार संताप्त पालकांनी या प्रकरणाची सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी पोक्सो प्रकरण असूनही प्रक्रियेला विलंब केल्याचा आरोप आहे. अखेर शुक्रवारी रात्री उशिरा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी बालकांचा लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण कायदा आणि भारतीय न्याय संहिता कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा प्राथमिक तपास केल्यानंतर आरोपीला (Badlapur Case) अटक केली.

बदलापूर आंदोलनाचा घटनाक्रम (Badlapur Case)

  • सकाळी 7:30 वाजता शाळेसमोर आंदोलन सुरू झालं
  • सकाळी10 वाजता आक्रमक आंदोलकांनी बदलापूर रेल्वे स्थानकात जाऊन रेल रोको सुरू केला. मध्य रेल्वे वरील कल्याण कर्जत आणि अंबरनाथ वरून बदलापूर कडे जाणाऱ्या अप आणि डाऊन दोन्ही मार्गाच्या रेल्वे सेवा पूर्णपणे बंद
  • सकाळी 11:10 वाजता मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत संयम ठेवण्याचा आवाहन केलं.
  • सकाळी 11:30 वाजता गुन्हा जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे उपमुख्यमंत्र्यांनी आदेश दिले
  • दुपारी 11:45 वाजता आंदोलकांकडून शाळेचे गेट तोडून आत जाण्याचा प्रयत्न
  • दुपारी बारा वाजता आंदोलकांनी शाळेत जाऊन तोडफोड केली
  • दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर तातडीची पत्रकार परिषद घेऊन आतापर्यंतच्या कारवाईची माहिती दिली.
  • दुपारी 12:40 वाजता पोलिसांनी रेल्वे ट्रॅक मोकळा केला. संतप्त आंदोलकांनी दगडफेक सुरू केली.
  • दुपारी एक वाजता पुन्हा आंदोलक रेल्वे ट्रॅकवर आले. पोलिसांकडून पुन्हा आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न सुरू झाला
  • दुपारी 1:10 वाजता शाळेबाहेर तणाव वाढला पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या