नंद्या व बब्या ठरले 50 हजारांचे मानकरी! भैरवनाथ यात्रेनिमित्त बैलगाड्यांची जंगी शर्यत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुसेसावळी | खटाव तालुक्यातील चोराडे येथील श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त ओपन व आदत बैलगाड्यांचे जंगी शर्यतीचे मैदान भरवण्यात आले होते. या यात्रेला बैलगाड्यांच्या आड्ड्यात 100 हून अधिक गाड्या पळवण्यात आल्या. या मैदानातील फायनलचा प्रथम क्रमांक 51 हजाराचा मानकरी बापूरावशेठ पिसाळ चोराडेकरांचा नंद्या व शंकर धनवडे आंबेगावकराचा बब्या ठरला.

चोराडेतील शर्यतीच्या आड्याचे यात्रा कमिटीच्या वतीने सकाळी दहा वाजल्या पासून मैदानावर येतील तसे गाड्यांची नोंद करण्याचे काम सुरु होते. बैलगाड्यांचे चालक व मालक मैदानावर आल्यावर आपली गाडी नोंद करण्यात मग्न होते. बैलगाड्या शर्यती सुरु झाल्यानंतर गाडी शौकिन आपली आवडती बैल जोडी घेऊन एकामागे एकेक करून मैदानात येत होते. सर्जा राजा असा आवाज घुमू लागला होता. जसजशे गाड्यांचे राऊंड पळत होते, तसतशी अड्डा पाहण्यासाठी प्रेक्षकांचा व गाडी शौकिनांची गर्दी वाढू लागली होती. तरी यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्या योग्य नियोजनामुळे बैलगाडा आड्डा यशस्वीरित्या पार पडला.

बैलगाडा शर्यतीतील विजेते पुढीलप्रमाणे

प्रथम क्रमांक 51 हजाराचा मानकरी बापूरावशेठ पिसाळ चोराडेकरांचा नंद्या व शंकर धनवडे आंबेगावकराचा बब्या, द्वितीय क्रमांक 41 हजाराचा मानकरी शिवांश घोरपडे (सदाशिवगड), तृतीय क्रमांक 31 हजाराचा मानकरी तुफान वादळ ग्रुप (गोरेगाव), चतुर्थ क्रमांक 21 हजाराचा मानकरी राजवल्ली प्रसन्न (वडगाव), पाचवा क्रमांक 11 हजाराचा मानकरी प्रिश सरगर (चिखली) यांनी मान पटकवला.