हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय बाजारात इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आकर्षक लूक आणि चालवायला सुद्धा आरामदायी असल्याने आणि महत्वाची बाब म्हणजे पेट्रोलचा खर्च वाचत असल्याने नवनवीन इलेक्ट्रिक गाड्या लाँच होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी Bajaj ने आपल्या इलेक्ट्रिक चेतकचे नवीन व्हेरिएन्ट लाँच केलं आहे. Bajaj Chetak 2901 असे या इलेक्ट्रिक स्कुटरचे नाव असून आधीच्या मॉडेलपेक्षा अगदी कमी किमतीत आणि ग्राहकांना परवडेल असा दरात हि इलेक्ट्रिक स्कुटर उपलब्ध आहे. आज आपण या इलेक्ट्रिक स्कुटरचे खास फीचर्स आणि किंमत याबाबत सविस्तर जाणून घेऊयात ….
बजाज चेतक 2901 ची डिझाईन हि आधीच्या मॉडेल प्रमाणेच आहे, मात्र यामध्ये बोल्ड कलर ऑप्शन देण्यात आलेत, ज्यामध्ये पांढरा, काळा, निळा आणि पिवळ्या रंगाचा समावेश आहे. ARAI प्रमाणपत्रानुसार, एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर हि इलेक्ट्रिक स्कुटर 123 किलोमीटर अंतर आरामात पार करू शकते. त्यामुळे लांबच्या प्रवासासाठी सुद्धा हि स्कुटर ग्राहकांच्या उपयोगाला येईल यात शंका नाही.
किंमत किती? Bajaj Chetak 2901
Bajaj Chetak 2901 ची कीमत 95,998 रुपये ठेवण्यात आली आहे. येत्या १५ जूनपासून या इलेक्ट्रिक स्कुटरची विक्री सुरू होणार आहे. भारतीय बाजारात हि स्कुटर Ather Rizta,TVS iQube, Ola S1X आणि Ola S1 Air या गाडयांना तगडी फाईट देईल. बजाज ऑटो लिमिटेडचे अर्बनाइटचे अध्यक्ष एरिक वोस म्हणाले, “चेतक डीलरशिपवर चेतक 2901 ची शिपमेंट सुरू झाल्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. चेतक 2901 ही डिझाईन, स्पेसिफिकेशन आणि किंमत असलेली मेटल बॉडी इलेक्ट्रिक स्कूटर ग्राहकांना कमी पैशात मिळत आहे. तुम्ही हि इलेक्ट्रिक स्कुटर जवळपास पेट्रोल स्कुटरच्या किमतीत खरेदी करू शकता. आम्हाला विश्वास आहे की चेतक 2901 इलेक्ट्रिक स्कूटर बाजारपेठेत चांगलं यश मिळवेल.