हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Bajaj CNG Bike । देशाच्या ऑटोमोबाईल क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या Bajaj ने एक मोठा निर्णय घेतला आहे. बजाजने भारतातील पहिली CNG बाईक असलेल्या Bajaj Freedom 125 ची किंमत कमी केली आहे. कंपनीने ५००० रुपयांनी CNG गाडी स्वस्त केली आहे. बजाज ची CNG बाईक ३ व्हेरियंट मध्ये येते, मात्र किंमतीतील हि कपात फक्त एंट्री-लेव्हल NG04 ड्रम व्हेरिएंटसाठी लागू आहे. कंपनीच्या या निर्णयानंतर NG04 ड्रम व्हेरिएंटची किंमत ८५,९७६ रुपयांपासून सुरू झाली आहे. त्यामुळे सीएनजी गाडी खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे पैसे आता वाचणार आहेत.
का कमी केली किंमत? Bajaj CNG Bike
Bajaj कंपनीने एंट्री-लेव्हल NG04 ड्रम व्हेरिएंटची किंमत का कमी केली याबाबत कोणतीही स्पष्ट अशी माहिती दिली नाही, परंतु असं बोललं जातंय कि मागच्या काही दिवसात फ्रीडम १२५ च्या विक्रीत घट झाल्याने कंपनीने असा निर्णय घेतला असावा. योग्य सीएनजी पायाभूत सुविधांचा अभाव आणि सीएनजीवर चालणाऱ्या गाड्यांबद्दल लोकांच्या मनात असलेली कमी जागरूकता यामुळे बजाजच्या सीएनजी बाईकचा खप म्हणावा तसा होताना दिसत नाही. आजकाल पेट्रोल आणि इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल जास्त असल्याने त्याचाही परिणाम बजाजच्या सीएनजी बाईक विक्रीवर होतोय.
बजाज सीएनजी बाईकच्या (Bajaj CNG Bike) मासिक विक्रीबद्दल सांगायचं झाल्यास, एप्रिल २०२५ मध्ये फ्रीडम १२५ च्या फक्त ९९३ गाड्यांची विक्री झाली होती. मार्च २०२५ मध्ये १,३९४ गाड्या विकल्या गेल्या. इतर बाईकच्या तुलनेत विक्रीचा हा आकडा खूपच कमी मानला जातो. आता कंपनीने बाईकची किंमत कमी केल्यानंतर आता तरी गाड्यांची विक्री वाढते का ते पाहायला हवं.
Bajaj CNG बाईकची वैशिष्ट्ये –
Bajaj CNG बाइकमध्ये १२५ सीसी सिंगल-सिलेंडर एअर-कूल्ड इंजिन बसवण्यात आलं आहे. हे इंजिन ९.५ पीएस पॉवर आणि ९.७ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. गाडीला २-लिटर पेट्रोल रिझर्व्होअर आणि २-लिटर सीएनजी टँक बसवण्यात आला आहे. १ किलो सीएनजी मध्ये (Bajaj CNG Bike) बजाज ची ही बाईक तब्बल १०० किलोमीटर पर्यंत अंतर आरामात पार करू शकते. तर पेट्रोल मोडवर ती ६५ किलोमीटर पर्यंत मायलेज देते. २ किलो CNG आणि २ लिटर पेट्रोल टाकल्यास तुम्ही या बाईकवरून ३३० किलोमीटर प्रवास आरामात करू शकाल. अन्य फीचर्स बाबत सांगायचे झाल्यास, जाज फ्रीडम १२५ मध्ये एलईडी हेडलाइट, ब्लूटूथद्वारे स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, गियर पोझिशन इंडिकेटर, कम्बाइंड ब्रेकिंग सिस्टम, रिअल-टाइम मायलेज इंडिकेटर, सिंगल-पीस सीट सारखी वैशिष्ट्ये मिळतात. बाईकचा लूक सुद्धा अतिशय स्पोर्टी असल्याने तरुणांना या बाईकची चांगलीच भुरळ आहे.




