बजाज ऑटो आठवड्यातून दोन दिवस राहणार बंद; ‘ऑटो हब’चे उत्पादन 50 टक्क्यांवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | कोरोना लॉकडाऊनमुळे देशभरात वाहनांसह सुट्या भागांची विक्री पूर्णता बंद असल्याने औद्योगिक क्षेत्र अडचणीत येण्यास सुरुवात झाली असून इलेक्ट्रॉनिक्स वाहन स्टील निर्मिती कंपन्यांनी 50 टक्‍क्‍यांपर्यंत उत्पादन घटविले आहे. यामुळे उद्योगांची पुरवठा साखळीच (सप्लाय चेन) ब्रेक झाली आहे. गेल्या आठवड्यापासून बजाज ऑटो मोबाईलनेही आठवड्यातून पाच दिवसच उत्पादनाचा निर्णय घेतल्याने अडचणीत भर पडली आहे.

देशातच नव्हे तर जगातील 90 देशांना जिल्ह्यातील लघु-मध्यम कंपन्या वाहनांचे सुटे भाग पुरवितात. त्यामुळे मागील अडीच महिन्यापासून स्थानिक बाजारपेठ बंद असताना देखील जिल्ह्यातील ऑटोमोबाईल हब भरून होते. मात्र, देशांतर्गत असलेल्या वाहन निर्मिती कंपन्यांनी आता हळूहळू उत्पादन घटविण्यास सुरुवात केली आहे. यात प्रामुख्याने होंडा, टोयोटा, मारुती सुझुकी, हिरो, इनफिल्ड यांचा समावेश आहे. या कंपन्यांनी काही दिवस उत्पादन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा परिणाम जिल्ह्यातील लघु मध्यम कंपन्यांवर झाला आहे.

गेल्या महिन्यापासून मोठ्या कंपन्यांकडून नियमित क्षमतेपेक्षा केवळ 50 ते 60 टक्के ऑर्डर मिळत आहेत. काही कंपन्यांनी मागील महिन्यात सुट्या भागासाठी ऑर्डरस दिलेली नाही त्यामुळे जिल्ह्यातील लघु-मध्यम कंपन्यांची उत्पादन क्षमता 50 टक्क्यांवर आली असल्याची माहिती चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चर (सीएमआयए) अध्यक्ष कमलेश धूत आणि मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चर (मसिआचे) याचे अध्यक्ष अभय हंचनाळ यांनी दिली आहे. सध्या देशांतर्गत उत्पादन बंद करून विदेशातील निर्यातीचे उत्पादन सुरू ठेवल्याने पाच दिवसच उत्पादन सुरू राहणार आहे. त्यामुळे या कंपनीवर अवलंबून असलेल्या इतर सहाशेहून अधिक लघु उद्योग अडचणीत आले आहेत.

तर …कंपन्या बंद कराव्या लागतील
सध्या मोठ्या व मध्यम कंपन्यांकडून लघु उद्योगांना देणाऱ्या ऑर्डर 50 टक्क्यांवर आले आहेत. त्यात पुढील महिन्यात जर देशांतर्गत परिस्थिती नियंत्रणात आली नाही आणि सर्व काही असेच राहिले तर येत्या एक जून नंतर जिल्ह्यातील अनेक लघुउद्योग बंद ठेवावे लागतील असे उद्योजक ज्ञानदेव राजाळे यांनी म्हटले आहे.