Friday, June 9, 2023

नवीन डिझाइनसहीत Bajaj Pulsar 220F पुन्हा लाँच, तपासा किंमत अन् फीचर्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bajaj Pulsar 220F : कोरोना काळानंतर भारतातील ऑटो सेक्टरने गरुड भरारी घेतली आहे. या नंतर अनेक कंपन्या नवनवीन गाड्या लाँच करत आहेत. आताही भारतीय दिग्गज कंपनी बजाज ऑटोने भारतात आपली स्पोर्ट्स बाइक Pulsar 220F पुन्हा लाँच केली आहे. हे जाणून घ्या कि, गेल्या वर्षी एप्रिल महिन्यापासून कंपनीने या बाइकची विक्री बंद केली होती. मात्र, या बाइकसाठी असलेली ग्राहकांची प्रचंड मागणी पाहता बजाजने त्यामध्ये काही बदल करत ती पुन्हा एकदा बाजारात आणली आहे. चला तर मग या नवीन गाडीचे डिझाइन, फीचर्स आणि किंमती विषयीची माहिती जाणून घेउयात…

Bajaj Pulsar 220F BS6 Officially Launched - ZigWheels

फीचर्स

या बाईकच्या इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये फ्युएल लेव्हल इंडिकेटर, स्पीडोमीटर,एनालॉग डायल आणि डिजिटल स्क्रीनसहीत सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल दिला गेला आहे. तसेच सिंगल-चॅनल ABS सोबत फ्रंट आणि रियर डिस्क ब्रेक्स देखील मिळतील. या बाईकमध्ये 17-इंच अलॉयजचा वापरण्यात आला आहे. कंपनीने या गाडीचा जुना लुकच कायम ठेवला असून यामध्ये क्लिप-ऑन हँडलबार, स्प्लिट सीट आणि मागील बाजूस टू-पीस ग्रॅब रेल देण्यात आले आहे. Bajaj Pulsar 220F

Bajaj Pulsar 220F ABS to be priced at Rs 1.05 lakh | Autocar India

इंजिन

इंजिनच्या बाबत बोलायचे झाल्यास यामध्ये 220cc सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड, इंधन-इंजेक्टेड इंजिन देण्यात आले आहे. जे जास्तीत जास्त 20bhp पॉवर आणि 18.5 Nm टॉर्क निर्माण करेल. हे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. याशिवाय, या बाइकचे इंजिन नवीन BS6 फेज-2 RDE स्टॅण्डर्डची पूर्तता करण्यासाठी अपडेट करण्यात आले आहे. Bajaj Pulsar 220F

Black And White Bajaj Pulsar 220F BS6 at Rs 130599 in Sonitpur | ID:  17262502491

किंमत

कंपनीने भारतात आपल्या बजाज पल्सरचे अपडेटेड व्हर्जन एकाच प्रकारात लाँच केली आहे, ज्याची किंमत 1.40 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. लवकरच त्याची विक्री देखील सुरू होण्याची अपेक्षा आहे. ही बाईक बाजारातील इतर कंपन्यांच्या Suzuki Gixxer SF आणि TVS च्या Apache RTR 180 सारख्या बाईकना टक्कर देतील. Bajaj Pulsar 220F

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bajajauto.com/bikes/pulsar

हे पण वाचा :
आता घरबसल्या Digital Gold वर मिळेल कर्ज, त्यासाठीचे व्याजदर पहा
खुशखबर !!! Ujjawla Yojana अंतर्गत LPG सिलेंडरवरील अनुदानाची मुदत एका वर्षासाठी वाढवली
Bank Holiday : एप्रिलमध्ये 15 दिवस बँका राहणार बंद, तपासा सुट्ट्यांची लिस्ट
Bike : दुचाकीचे सेल्फ स्टार्ट खराब झाले तर किक न मारताही कशी सुरू करावी ते जाणून घ्या
खुशखबर !!! आता Bank of Baroda च्या ग्राहकांना क्रेडिट कार्डद्वारे करता येणार UPI पेमेंट, जाणून घ्या त्यासाठीची प्रक्रिया