Bajaj Pulsar N160 चे नवीन व्हेरिएन्ट लाँच; कोणत्याही रस्त्यावर आरामात धावणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध दुचाकी निर्माता कंपनी बजाजने आपली Bajaj Pulsar N160 बाईक नव्या व्हेरियेण्ट मध्ये लाँच केली आहे. या बाइकमध्ये टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन आणि अपसाइड डाउन (USD) फोर्क्ससह ABS राइड मोड्स यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत. Pulsar N160 सोबतच कंपनीने पल्सर 125, 150 आणि 220F या बाईक सुद्धा नव्या फीचर्ससह अपडेट केल्यात. या सर्व गाड्यांमध्ये नेमकं काय वेगळपण आहे हेच आज आपण जाणून घेऊयात….

ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचा पर्याय-

नवीन Bajaj Pulsar N160 मध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचा पर्याय देण्यात आला आहे. म्हणजेच काय तर तुम्ही ब्लूटूथद्वारे तुमचा मोबाइल बाइकशी कनेक्ट करू शकता. ब्लूटूथला जोडणारा एक इन्स्ट्रुमेंट कन्सोल देण्यात आला आहे. राइडिंग करताना तुम्हाला कॉल आणि एसएमएस अलर्टचीही माहिती मिळेल. या नवीन फीचर्समुळे रायडिंगचा अनुभव सुधारण्यास मदत होईल, असा दावा बजाजने केला आहे. कंपनीने पल्सर N160 च्या नव्या व्हेरियेण्टचे ग्राफिक्स स्टिकर्स देखील बदलले आहेत. नवीन Pulsar N160 बाईकमध्ये 33mm सोनेरी रंगाचे UST फॉर्क्स मिळतील. ज्याच्या मदतीने तुम्हाला उत्तम हँडलिंग आणि राइडिंगचा अनुभव मिळेल. या अपडेटेड पल्सरमध्ये रेन, रोड आणि ऑफ-रोड असे 3 वेगवेगळे ABS मोड मिळतील.

हे पण वाचा : टाटा समूहाची मोबाईल क्षेत्रात उडी?? या कंपनीलाच खरेदी करणार

इंजिन – Bajaj Pulsar N160

Pulsar N160 च्या सर्व व्हेरिएन्टमध्ये 164.82cc ऑइल-कूल्ड इंजिन बसवण्यात आलं आहे. हे इंजिन 8,750 rpm वर 11.7 kW ची मॅक्सिमम पॉवर जनरेट करते. बाइकच्या दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी यात ड्युअल-चॅनल एबीएस देखील आहे. खास बाब म्हणजे नवीन Pulsar N160 मध्ये मल्टी राइड मोड्स देण्यात आलेत ज्यामुळे रस्ता ओला असो वा सुकलेला असो, चांगला असो वा खचलेला असो.. कोणत्या रस्त्या तुम्ही सुरक्षितपणे गाडी चालवू शकता. या अपडेटेड पल्सरमध्ये रोड मोड स्टॅंडर्ड म्हणून सेट केला आहे. शहर आणि महामार्गानुसार बाईक ट्यून करण्यात आली आहे. पावसात ही बाईक चालवत असताना आणि रस्ता कसाही असताना सुद्धा रायडींग वेळी तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही, असा कंपनीचा दावा आहे.

किंमत किती?

आता राहिला आणि महत्वाचा प्रश्न तो म्हणजे बाईकच्या किमतीचा … तर Bajaj Pulsar N160 च्या अपडेटेड व्हेरिएन्टची किंमत 1,39,693 रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. तर Pulsar 125 ची एक्स-शोरूम किंमत 92,883 रुपये, Pulsar 150 ची किंमत 1,13,696 रुपये आणि Pulsar 220F ची किंमत 1,41,024 रुपये निश्चित करण्यात आली आहे.