Bajaj Pulsar NS400Z : Bajaj ने 373cc इंजिनसह लाँच केली पॉवरफुल्ल Bike; किंमत पाहून उडेल झोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी Bajaj च्या गाड्या भारतात तुफान लोकप्रिय आहेत. मजबूत इंजिन क्षमतेसाठी बजाजच्या बाईक ओळखल्या जातात. आताही कंपनीने 373cc इंजिनसह एक नवीन बाईक बाजारात आणली आणली आहे. Bajaj Pulsar NS400Z असे या गाडीचे नाव असून यामध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आलेत आहेत. गाडीचा लूक अतिशय स्पोर्टी असून बघताक्षणीच तुमच्या मनात भरेल यात शंका नाही. बजाजने आपल्या या बाईकची किंमत तब्बल 1.85 लाख रुपये ठेवली आहे.

गाडीच्या लूक आणि डिझाईनबाबत सांगायचं झाल्यास, Bajaj Pulsar NS400Z दिसायला खूपच आकर्षक आहे. एकदम स्पोर्टी फील देणारी हि बाईक तरुणाईच्या मनावर अधिराज्य गाजवेल हे नक्की.. बाईकमध्ये शार्प फेअरिंगचा वापर करण्यात आला आहे ज्यामुळे ती मस्क्युलर आणि जड दिसते. गाडीच्या समोरील बाजूला इनव्हर्टेड टेलिस्कोपिक फोर्क आणि मागील बाजूस मोनोशॉक सस्पेंशन आहे. मोटरसायकलमध्ये एलईडी हेडलॅम्प, टेल लॅम्प आणि टर्न इंडिकेटर देण्यात आले आहेत.

373cc इंजिन- Bajaj Pulsar NS400Z

बजाज पल्सर NS400G मध्ये शक्तिशाली 373cc इंजिन आहे. हे इंजिन 40 PS पॉवर आणि 35 न्यूटन मीटर पीक टॉर्क जनरेट करते. गाडीला तब्बल 154 किलोमीटर प्रति तास टॉप स्पीड मिळते. बाइकमध्ये 5 स्टेप ॲडजस्टेबल लीव्हर, ड्युअल चॅनल एबीएस, दोन्ही टायरवरील डिस्क ब्रेक्स, अपसाइड डाउन फ्रंट फोर्क्स यासारख्या अनेक फीचर्स देण्यात आले असून यामुळे गाडी चालवताना अतिशय चांगला रायडींग अनुभव मिळेल. बजाजच्या या बाईक मध्ये रेन, रोड, ऑफ-रोड और स्पोर्ट असे एकूण ४ मोड देण्यात आले आहेत.

किंमत किती?

गाडीच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, Bajaj Pulsar NS400Z ची एक्स-शोरूम किंमत 1.85 लाख रुपये इतकी आहे. या किमतीमध्ये आगामी काळात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. बजाजची ही स्पोर्टी बाईक लाल, काळा, पांढरा आणि ग्रे रंगात उपलब्ध असून ग्राहक 5000 रुपयांच्या टोकन रकमेवर या बाईकचे बुकिंग करू शकतात. त्यानंतर जून महिन्यात या गाडीची डिलिव्हरी सुरु होईल.